जर्मन भाषा शिका , शिकवा आणि जर्मनीत रोजगार मिळवा
पार्श्वभूमी
नाव नोंदणी साठीची लिंक -
प्रमाणपत्र कोणास मिळणार
निवासी तांत्रिक अभ्यासक्रम
कागदपत्रांची तपासणी
जर्मन भाषा प्रशिक्षण केंद्र
समाविष्ट तांत्रिक कौशल्य
जर्मन भाषा शिकण्यासाठी राज्यातील शिक्षकांना सुवर्णसंधी
योजना कशासाठी
नमस्कार,
आपल्याला माहितच असेल की महाराष्ट्र शासनाने जर्मन भाषा शिकविणाऱ्या शिक्षकांसाठी एक नवा प्रकल्प सुरू केला आहे. यामध्ये, जर्मन भाषेतील कुशल मनुष्यबळाची गरज ओळखून, महाराष्ट्रातील शिक्षकांना जर्मन भाषा शिकवण्याचे प्रशिक्षण दिले जाईल.
प्रशिक्षण कुणामार्फत दिले जाणार
या संदर्भात, शासनाने २५ फेब्रुवारी २०२४ रोजी जर्मन राज्य बाडेन बुटेनबर्गशी एक सामंजस्य करार केला आहे.
या कराराद्वारे, महाराष्ट्रातील शिक्षकांना जर्मन भाषा शिकवण्यासाठी प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षण वर्ग ०९ ऑगस्ट २०२४ रोजी ग्योथे इन्स्टिट्यूट आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या मदतीने सुरू होईल.
कोणते शिक्षक अर्ज करू शकतात
आता, आपल्या विभागातील किंवा जिल्ह्यातील शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेतील शिक्षकांना जर्मन भाषेचे प्रशिक्षण घेण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. शिक्षकांना जर्मन भाषा शिकवण्यासाठी आवश्यक असलेले प्रमाणपत्रे प्राप्त करण्यासाठी आम्ही २०० प्रशिक्षण वर्ग सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवलेला आहे.
नाव नोंदणी कशी करता येईल
या प्रशिक्षण वर्गासाठी शिक्षकांची नावनोंदणी करण्यासाठी एक गुगल फॉर्म तयार करण्यात आलेला आहे. कृपया खालील लिंकवर जाऊन आपल्या नावाची नोंदणी करा:
शिक्षकांची नावनोंदणी - Google Forms
https://forms.gle/1Q32ByNwp9MnHmHc7
शिक्षकांनी जर्मन भाषा शिकण्यासाठी या लिंकवर नावनोंदणी करावी तसेच या माहितीची प्रसार करून अधिक शिक्षकांना प्रोत्साहित करावे.
विस्तृत माहितीसाठी - संदर्भिय पत्र
विषय :- जर्मन भाषा शिकण्याची आवड असणाऱ्या शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमधील शिक्षकांना शालेय शिक्षण विभागामार्फत आयोजित जर्मन भाषा प्रशिक्षण वर्गात नाव नोंदणी करण्यास आवाहन करणे बाबत.
उपरोक्त संदर्भीय विषयाच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेले कुशल मनुष्यबळ आणि अन्य प्रगत युरोपियन देशांमध्ये त्यांची असणारी कमतरता या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यातील युवकांना युरोपियन देशांमध्ये नोकरी व रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत, ही बाब विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाने जर्मन देशातील बाडेन बुटेनबर्ग या राज्याशी कुशल मनुष्यबळ प्रशिक्षित करून उपलब्ध करून देणे याबाबत सामंजस्य करार दिनांक २५/२/२०२४ रोजी केला आहे.
तसेच पुढील कामकाजाची दिशा ठरविण्यासाठी दि.११ जुलै, २०२४ शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
या अनुषंगाने जर्मन भाषा शिकविण्यासाठी ग्योथे इन्स्टिट्यूट, मॅक्सम्युलर भवन पुणे व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या मध्ये दिनांक ०९/०८/२०२४ रोजी सामंजस्य करार करण्यात आला आहे.
जर्मन भाषा शिकविण्यासाठी जिल्हास्तरावर २५ विद्यार्थ्यांसाठी एक प्रशिक्षण वर्ग याप्रमणे १०००० विद्यार्थ्यांसाठी ४०० प्रशिक्षण वर्गाची आवश्यकता आहे.
सदर प्रशिक्षण वर्ग दोन सत्रात असल्याने (सकाळ व संध्याकाळ) असे २०० प्रशिक्षण वर्ग सुरु करणे प्रस्तावित आहे.
या प्रशिक्षण वर्गासाठी जर्मन भाषेची अर्हता BA in जर्मन, MA in जर्मन, ग्योथे इन्स्टिट्यूट यांचे द्वारे घेण्यात येणारी स्तरनिहाय A1, A2, B1, B2,C1,C2 उत्तीर्ण असणाऱ्या शिक्षकांची संख्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही.
त्यामुळे शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमधील नियमित शिक्षकांसाठी जर्मन भाषेचे प्रशिक्षण वर्ग शासनामार्फत मोफत सुरु करणे प्रस्तावित असून
शिक्षकांची नावनोंदणी करण्यासाठी
https://forms.gle/1Q32ByNwp9MnHmHc7
ही गुगल लिंक तयार करण्यात आली आहे.
उपरोक्त लिंक वर शिक्षक नावनोंदणी करीत आहेत. तथापि जर्मन भाषा शिकविण्यासाठी मोठ्या संस्थेने शिक्षकांची आवश्यकता असल्याने आपल्या विभागातील / जिल्ह्यातील शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्था मधील जर्मन भाषा शिकण्याची आवड असणाऱ्या शिक्षकांना उपरोक्त लिंक वर नाव नोंदणी करणेबाबत आवाहन करण्यात येत आहे.
0 Comments