महाराष्ट्रात शैक्षणिक क्रांती: 2025-26 पासून पहिलीपासून ‘एनसीईआरटी’ अभ्यासक्रम
महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात मोठा बदल होणार आहे! 2025-26 शैक्षणिक वर्षापासून पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम हा ‘एनसीईआरटी’च्या धर्तीवर तयार केला जाणार आहे.
याचबरोबर, ‘सीबीएसई’प्रमाणे वेळापत्रक लागू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. हा बदल शालेय शिक्षणाच्या दर्जात मोठी सुधारणा घडवेल, असे शिक्षण तज्ज्ञांचे मत आहे.
शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विधान परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, या नव्या अभ्यासक्रमासाठी पहिलीच्या नवीन पुस्तकांची उपलब्धता जून 2025 पूर्वीच केली जाणार आहे.
तसेच, येत्या काही वर्षांत इयत्ता 1 ते 12 पर्यंतच्या सर्व पुस्तकांमध्ये टप्प्याटप्प्याने बदल केले जातील.
महाराष्ट्रातील शैक्षणिक वेळापत्रकात बदल
शालेय शिक्षण विभागाने ‘सीबीएसई’च्या धर्तीवर वेळापत्रक लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, 2025-26 मध्ये हे त्वरित अंमलात येणार नाही.
कारण यंदा परीक्षाच 24 एप्रिल 2025 पर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे ‘सीबीएसई’प्रमाणे 1 एप्रिलपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करता येणार नाही.
त्याऐवजी, 15 जून 2025 पासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भविष्यात, संपूर्ण राज्यात 1 एप्रिलपासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा विचार केला जात आहे.
शालेय शिक्षणात नवीन बदल कसे असतील?
✅ ‘एनसीईआरटी’च्या धर्तीवर अभ्यासक्रम:
1. 2025-26 मध्ये पहिलीपासून अभ्यासक्रम लागू होईल.✅ ‘सीबीएसई’सारखे शालेय वेळापत्रक:
1. हळूहळू राज्यात लागू करण्याची प्रक्रिया सुरू आहे.✅ परीक्षा आणि नवीन अभ्यासक्रम:
1. नवीन अभ्यासक्रम 2025-26 पासून टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येणार आहे.हा बदल विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर का?
1. राष्ट्रीय स्तरावर स्पर्धात्मकता वाढेल
‘एनसीईआरटी’ अभ्यासक्रमामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना JEE, NEET, UPSC सारख्या राष्ट्रीय परीक्षांसाठी चांगली तयारी करता येईल.
विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळून स्पर्धात्मक वातावरनात टिकून राहता येईल. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याचा सर्वाधिक फायदा होईल.
2. समकालीन आणि आधुनिक शिक्षण प्रणाली
‘सीबीएसई’ वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांना संशोधन, कौशल्यविकास आणि उपयोजित शिक्षणावर भर देता येईल.
ज्ञान, उपयोजन व कौशल्य विकास या प्रक्रियेतून गेल्यामुळे जीवनासाठी शिक्षण हा हेतू साध्य होईल.
3. शिक्षणाची गुणवत्ता वाढेल
‘एनसीईआरटी’ अभ्यासक्रमामुळे राज्यभर एकसमान आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाईल.
पाठ्यक्रमातील आशय अद्ययावत राहून पाठ्य विषय आशय समृद्ध होतील.
शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांची भूमिका
✅ शिक्षकांनी नवीन अभ्यासक्रम आणि अध्यापन पद्धती आत्मसात कराव्यात व त्यानुसार आपले व्यावसायिक कौशल्य वाढवावे. CPD साठी विविध प्रशिक्षणात सहभागी व्हावे.
✅ पालकांनी बदल स्वीकारून मुलांना नवीन अभ्यासक्रमानुसार मार्गदर्शन करावे. स्वतः पाठ्यक्रम समजून घ्यावा. त्यासाठी online platform चा उपयोग करून घ्यावा.
✅ विद्यार्थ्यांनी नवीन अभ्यासक्रमाचा फायदा घेऊन त्याच्या अनुषंगाने तयारी करावी. नाविन्यपूर्ण गोष्टी शिकण्यासाठी सदैव तयार रहावे.
2025-26 पासून ‘NCERT’ अभ्यासक्रम आणि ‘CBSE’ परीक्षा पद्धती कशी लागू होणार ! - शालेय शिक्षण मंत्र्यांनी केले स्पष्ट
महाराष्ट्र सरकारने शालेय शिक्षण क्षेत्रात मोठा आणि ऐतिहासिक बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) 2020 च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार राज्यात 2025-26 पासून NCERT अभ्यासक्रम आणि CBSE परीक्षा पद्धती लागू केली जाणार आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरच्या परीक्षांसाठी अधिक चांगली तयारी करता येणार आहे.
या बदलांमुळे विद्यार्थ्यांना कोणते फायदे होणार?
1. संकल्पनात्मक शिक्षण: पाठांतरावर भर न देता विद्यार्थ्यांच्या संकल्पनांची स्पष्ट समजूत होईल.नवीन अभ्यासक्रम कसा लागू केला जाणार आहे?
हा बदल टप्प्याटप्प्याने लागू केला जाणार आहे. 2025 पासून इयत्ता पहिलीसाठी नवीन अभ्यासक्रम सुरू होईल, आणि नंतर हळूहळू अन्य वर्गांमध्ये तो लागू केला जाईल.
शैक्षणिक वर्ष | अभ्यासक्रम लागू होणारे वर्ग |
---|---|
2025-26 | इयत्ता 1 वी |
2026-27 | 2 वी, 3 वी, 4 वी, 6 वी |
2027-28 | 5 वी, 7 वी, 9 वी, 11 वी |
2028-29 | 8 वी, 10 वी, 12 वी |
पाठ्यपुस्तकं आणि अभ्यासक्रम निर्मिती -
राज्य मंडळाची पाठ्यपुस्तकं बालभारतीकडून तयार केली जाणार आहेत. NCERT च्या पुस्तकांचा अभ्यास करून राज्याच्या गरजेनुसार आवश्यक बदलांसह बालभारती स्वतंत्र पाठ्यपुस्तकं बनवणार आहे. SCERT मार्फत इयत्ता १ ली ते १० वीचा अभ्यासक्रम तयार होत असून, नव्या धोरणानुसार पहिलीच्या पुस्तकांचं काम सुरू आहे.
राज्य मंडळाचे काय होणार?
शिक्षणमंत्र्यांनुसार, महाराष्ट्राची शैक्षणिक परंपरा लक्षात घेता राज्य मंडळ बंद होणार नाही. CBSE पॅटर्नचा अभ्यासक्रम स्वीकारला जाईल, पण १० वी आणि १२ वीच्या परीक्षा राज्य मंडळच घेणार आहे. पालकांवर बोर्ड निवडीचं कोणतंही बंधन असणार नाही.
इतिहास आणि भूगोल विषयाचे स्वरूप कसे असेल?
नव्या अभ्यासक्रमात महाराष्ट्राची संस्कृती, संत, समाजसुधारक आणि ऐतिहासिक व्यक्तींना प्राधान्य असेल. इतिहास, भूगोल आणि भाषा विषयांत या बाबींचा समावेश असेल. शिवाय, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांचा इतिहास नव्या अभ्यासक्रमात सुस्पष्टपणे समाविष्ट केला जाईल.
शैक्षणिक वेळापत्रक आणि मोफत शिक्षण -
वेळापत्रक हवामान आणि भौगोलिक परिस्थितीनुसार ठरेल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि अनुदानित शाळांमधील मुलांना १० वीपर्यंत आणि मुलींना १२ वीपर्यंत मोफत शिक्षण मिळेल.
मराठी भाषेचे महत्त्व कायम राहणार!
या नव्या धोरणामुळे मराठी भाषेच्या शिकवणीवर कोणताही परिणाम होणार नाही. राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य राहील, जेणेकरून तिचा सन्मान आणि अभिजात दर्जा कायम राहील.
शिक्षकांसाठी विशेष प्रशिक्षण
या बदलाला यशस्वी करण्यासाठी शिक्षकांना आवश्यक प्रशिक्षण दिले जाणार आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार शिकवण्यासाठी शिक्षकांना विशेष ब्रिज कोर्सेस व कार्यशाळा आयोजित केल्या जातील.
शाळांचे भौतिक सुधारणा आणि मोफत शिक्षण
1. सरकारी व अनुदानित शाळांमध्ये आवश्यक भौतिक सुविधा जसे की पिण्याचे पाणी, शौचालये, डिजिटल क्लासरूम्स, क्रीडांगण यांचा समावेश असेल.ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी नवीन अभ्यासक्रम कसा फायदेशीर ठरेल?
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रम कठीण जाऊ नये म्हणून त्यांच्या गरजा विचारात घेत अभ्यासक्रम तयार केला जाईल. जिल्हा परिषद आणि नगरपालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्यातील करिअर मजबूत करण्यासाठी हे धोरण उपयुक्त ठरणार आहे.
पालकांसाठी महत्त्वाची माहिती
1. पालकांना शाळा किंवा बोर्ड निवडण्याचा संपूर्ण स्वातंत्र्य असेल.महाराष्ट्राच्या उज्ज्वल शैक्षणिक भविष्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा!
शालेय शिक्षण विभागाने महाराष्ट्राच्या शैक्षणिक परंपरेला पुढे नेत हे नवे धोरण स्वीकारले आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने महाराष्ट्रातील विद्यार्थी आता जागतिक स्तरावर अधिक सक्षम होतील.
सारांश
महाराष्ट्र सरकारने शिक्षणव्यवस्थेत मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. 2025-26 पासून ‘एनसीईआरटी’च्या आधारावर अभ्यासक्रम आणि ‘सीबीएसई’सारखे वेळापत्रक लागू करण्याची तयारी सुरू आहे. हा बदल विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धेसाठी सक्षम करेल. भविष्यातील शिक्षणासाठी हा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे!
तुमच्या मते हा बदल कसा आहे? आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये शेअर करा!
0 Comments