श्रीरामाचा आशीर्वाद मिळवायचाय? मग हे रामनवमी विशेष वाचा!
![]() |
रामनवमी जन्मोत्सव उत्सव
हिंदू धर्मग्रंथातील मान्यतेनुसार, त्रेतायुगातील रावणाचे अन्याय अत्याचार संपवण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी भगवान विष्णूने पृथ्वीवर श्री राम म्हणून अवतार घेतला.
श्री रामाचा जन्म चैत्र शुक्ल नवमीला राणी कौशल्याच्या पोटी पुनर्वसु नक्षत्रात आणि कर्क राशीत राजा दशरथाच्या घरी झाला.
राम म्हणजे काय?
ज्याला पाहून मन रमते, आकर्षित होते, मनुष्य स्वतःला विसरून जातो, मुग्ध होतो, भारावून जातो अशी व्यक्ती म्हणजे राम.
स्वयंप्रकाश,अंतःप्रकाश,स्वतःच्या आतील प्रकाश. 'रवि' चा अर्थ देखील तोच आहे. र - म्हणजे प्रकाश, वि - म्हणजे विशेष. याचा अर्थ आहे आपल्या आतील शाश्वत प्रकाश! म्हणजे आपल्या आत्म्याचा प्रकाश म्हणजे राम.
'राम नवमी' आपल्यातील दिव्य आत्मप्रकाश प्रकटी प्रित्यर्थ साजरी केली जाते. भगवान रामाचा जन्म राजा दशरथ आणि राणी कौसल्येच्या पोटी झाला होता.
रामायणातील व्यक्ती व त्यांच्या नावांचा अर्थ -
रामनवमी संपूर्ण भारतात साजरी केली जाते. रामनवमी हा सण गेल्या अनेक वर्षांपासून साजरा केला जातो.
रामनवमीची पार्श्वभूमी काय आहे?
रामायणानुसार, अयोध्येचा राजा दशरथ याला तीन बायका होत्या, परंतु फार काळ राजा दशरथला संततीचे सुख कोणीही देऊ शकले नाही, त्यामुळे राजा दशरथ खूप अस्वस्थ असायचे.
पुत्रप्राप्तीसाठी राजा दशरथ यांना वशिष्ठ ऋषींनी पुत्रकामेष्टी यज्ञ करण्याची कल्पना दिली होती.
यानंतर राजा दशरथाने महर्षी ऋषिश्रृंगासोबत यज्ञ केला.
त्यानंतर यज्ञकुंडातून एक दैवी पुरुष हातात खीरची वाटी घेऊन बाहेर आला.
यज्ञ संपल्यानंतर महर्षी ऋषीशृंगाने दशरथाच्या तीन पत्नींना खीरीची वाटी खायला दिली.
खीर खाल्ल्यानंतर काही महिन्यांनी सर्व तिन्ही राण्या गरोदर राहिल्या.
बरोबर ९ महिन्यांनंतर, राजा दशरथाची ज्येष्ठ राणी कौशल्याने राम, भगवान विष्णूचा सातवा अवतार,
कैकेयी यांनी भरत आणि सुमित्रा यांना लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांना जन्म दिला.
भगवान रामाचा जन्म दुष्ट प्राण्यांचा नाश करण्यासाठी पृथ्वीवर झाला होता.
रामनवमी कशी साजरी करतात?
श्री रामांची पूजा करताना त्यानां करंगळीजवळच्या बोटाने, म्हणजेच अनामिकेने गंध लावतात.
तसेच श्री रामांना हळद-कुंकू वहातांना आधी हळद अन् नंतर कुंकू, उजव्या हाताच्या अंगठा आणि अनामिका यांच्या चिमटीत घेऊन चरणांवर वाहतात.
श्रीरामांना केवडा, चंपा, चमेली अन् जाई ही फुले वाहतात. त्यानंतर आरती करून प्रसाद वाटतात.
रामजन्माच्या दिवशी साजऱ्या केल्या जाणाऱ्या उत्सवांत रामजन्माचा पाळणा अवश्य म्हटला जातो. "Ram Navami"
रामनवमीची मिरवणूक कधी काढली जाते?
श्रीरामनवमीच्या दिवशी मठ-मंदिरात भजन, पूजन, कीर्तन, प्रवचन इत्यादी कार्यक्रम करून हा जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो.
काही ठिकाणी तर गुढीपाडवा ते रामनवमी ह्या काळांत रामायण ग्रंथाचे वाचन, रामकथेचे निवेदन, गीत रामायणाचे गायन वगैरे कार्यक्रमही केले जातात. Ram Navami
श्रीराम हे सर्व आबालवृद्धांची लाडकी देवता असल्यामुळे सर्व लहान थोर मंडळी ह्या उत्सवात भाग घेतात.
राम नवमी पूजेसाठी लागणारी सामग्री कोणती?
आंब्याचं लाकूड, आंब्याची पानं, पिंपळाचं पान, बेल, लिंबाची पानं, ,बेल, नीम, उंबराची साल, चंदनाचं लाकूड, अश्वगंधा, गुळवेलची मुळी, कापूर, तीळ, तांदूळ, लवंग, गाईचं तूप, विलायची, साखर, नवग्रहाचं लाकूड, पंचामृत, नारळ, जवस इत्यादी.
1. आंब्याची पाने आणि लाकूडराम नवमी पूजेची पद्धत :
1. सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करतात.
रामनवमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे आटोपल्यानंतर स्वच्छ कपडे घालतात.
2. भगवान श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण यांची मनोभावे पूजा केली जाते.
त्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्य भगवान श्री राम, लक्ष्मण आणि माता सीता यांची विधिपूर्वक पूजा करतात.
3. श्रीरामांना तुळशीपत्र अर्पण केल्याने विशेष कृपा होते.
पूजेपूर्वी त्यांना कुंकु, सिंदूर, रोळी, चंदन इत्यादींचा तिलक लावतात. रामनवमीच्या दिवशी भगवान विष्णूचा अवतार श्री राम यांना तुळशी अर्पण केल्याने ते लवकर प्रसन्न होतात.
4. पूजेनंतर रामचरितमानस, रामरक्षा स्तोत्र व रामायणाचे पठण केले जाते.
पूजेमध्ये देवतांना फुले अर्पण करावे. त्यानंतर तुपाचा दिवा आणि अगरबत्ती लावल्यानंतर श्री रामचरित मानस, रामरक्षा स्तोत्र किंवा रामायणाचे पठण करावे. 'Ram Navami'
5. श्रीरामांचा पाळणा झुलवून आरती केली जाते व प्रसाद वाटला जातो.
श्री राम, लक्ष्मणजी आणि माता सीता यांना झुलवल्यानंतर त्यांची आरती करा आणि भक्तांमध्ये प्रसादाचे वाटप करतात.
रामचरित मानसाचे पठण का केले जाते?
सनातन हिंदू धर्माचे लोक आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी रामनवमीला रामचरित मानसाचे पठण करतात. त्यामुळे रामाचा विशेष आशीर्वाद मिळतो, असे मानले जाते.
- सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि अडचणी दूर होण्यासाठी रामनवमीमध्ये या वचनाचा जप करावा.
कवन सो काज कठिन जग माहीं ! जो नहिं होइ तात तुम पाहीं!!
- लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि व्यवसायात प्रगती करायची असेल तर रामचरितमानसच्या या वचनाचा जप करा.
जिमि सरिता सागर मंहु जाही !
जद्यपि ताहि कामना नाहीं!!
तिमि सुख संपत्ति बिनहि बोलाएं! धर्मशील पहिं जहि सुभाएं!!
- पैसा-संपत्ती मिळवायची असेल तर रामचरित मानस या वचनाचा जप करा.
जे सकाम नर सुनहि जे गावहि ! सुख संपत्ति नान विधि पावहि!!
- संकटाचा सामना करण्यासाठी तुम्ही रामचरितमानसच्या या चौपईचा जप करू शकता.
दीन दयालु विरद संभारी ! हरहु नाथ मम संकट भारी!
- परीक्षेत चांगले गुण मिळवायचे असतील तर रामचरित मानसच्या या चौपाईचा जप करा.
जेहि पर कृपा करहि जनु जानी ! कवि उर अजिर नचावहि बानी !! मोरि सुधारिहि सो सब भांती!जासु कृपा नहिं कृपा अघाति!!
- रिद्धी-सिद्ध मिळवायची असेल तर रामचरित मानसच्या या चौपाईचा पाठ करा.
साधक नाम जपहिं लय लाएं!होहि सिद्धि अनिमादिक पाएं!!
- घरगुती वाद-त्रास दूर करण्यासाठी रामचरित मानसच्या या चौपाईचा जप करा.
हरन कठिन कलि कलुष कलेसू ! महामोह निसि दलन दिनेसू!!
- वैवाहिक जीवनात काही अडचण निर्माण होत असेल तर रामचरित मानसच्या या वचनाचा जप करा.
तब जनक पाइ बसिष्ठ आयसु ब्याह साज संवारि कै!मांडवी श्रुतकीरति उरमिला कुअंरि लईं हंकारि कै!!
सारांश - श्रीराम हे आदर्शाचं प्रतीक
श्रीराम हे सत्य, धर्म, प्रेम, समर्पण, संयम, आणि कर्तव्याचा मूर्तिमंत आदर्श आहेत. रामनवमी केवळ एक सण नाही, तर आपल्या जीवनातल्या अंध:कारावर विजय मिळवण्याचं, आपल्या आत्म्याच्या प्रकाशाला साजरं करण्याचं एक पवित्र निमित्त आहे.
जय श्रीराम..जय जय श्रीराम..
जय सियाराम..
0 Comments