उन्हाळ्यात डोळ्यांची काळजी
उन्हाळ्यात सर्रास दिसणाऱ्या डोळ्यांच्या तक्रारी :
# डोळे दुखणे
# डोळ्यात काहीतरी टोचल्यासारखे जाणवणे
# डोळे चुरचुरणे, लाल होणे, डोळ्यांची आग, जळजळ होणे
# दिवसभर उन्हात वावरल्यावर डोळ्यांवर ताण येणे
# रांजणवाडी होणे
# डोळे येणे (विषाणूजन्य कंजंक्टिव्हायटिस)
उन्हाळ्यात सामान्यत: दिसणारी लक्षणे -
# प्रथम डोळे थोडे लाल दिसू लागतात.
# पापण्यांच्या आत खाज सुटते.
# सकाळी झोपेतून उठल्यावर डोळ्यांवर थोडीशी सूज दिसते
डोळ्यांची काळजी कशी घ्यावी-
# दिवसातून एक-दोन वेळा तरी काम थांबवून डोळे मिटून पाच मिनिटे शांत बसा.
यामुळे डोळ्यांवरचा ताण दूर व्हायला मदत होईल.
डोळे चुरचुरणे आणि लाल होण्याचा त्रास असेल तर अशा प्रकारे डोळ्यांना विश्रांती देणे फायदेशीर ठरते.
# थंड पाण्यात भिजवलेल्या कापडाची पट्टी डोळ्यांवर ठेवूनही बरे वाटते.
हा उपाय कार्यालयात असतानाही करता येऊ शकेल.
# रात्री झोपताना डोळ्यांवर काकडीच्या चकत्या किंवा दुधात भिजवलेल्या कापडाच्या घडय़ा ठेवून झोपा.
# दिवसभर दर दीड-दोन तासांनी डोळ्यांवर व चेहऱ्यावर पाण्याचा हबका मारा.
# दिवसातून एकदा किंवा रात्री झोपण्यापूर्वी गुलाबपाण्याने अथवा गार पाण्याने डोळे धुवा.
काय खावे- काय प्यावे-
# नारळ पाणी, लिंबू सरबत, ताक अशी पेये अधूनमधून आवर्जून प्या.
# उन्हात फिरून आल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका.
# फ्रिजमधील पाण्यापेक्षा माठातले पाणी पिणे चांगले.
# काकडी, टोमॅटो, कोथिंबीर, कांद्याची पात चिरून त्यात मीठ- मिरपूड घालून दररोज जेवणात घ्या.
# रोज पांढरा कांदा खा. हा कांदा तिखट नसतो आणि पाणीदार असतो.
0 Comments