Header Ads Widget

काय आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना | Namo shetkari mahasanman yojana

 

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना

काय आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना   (Namo shetkari mahasanman yojana)

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारची नवी योजना लागू . ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ ही नवी योजना राबवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. ही योजना नेमकी कशी आहे याविषयी माहिती आपण घेणार आहोत.

 ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना' - चे स्वरूप  काय आहे?

- नमो शेतकरी महा सन्मान निधी ही केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान योजनेसारखीच आहे.

या योजनेनुसार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर महाराष्ट्र सरकार वर्षाला सहा हजार रुपये जमा करेल.

केंद्र सरकारकडून दर तीन महिन्याला दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात.याप्रमाणेच आता राज्य सरकारही दर तीन महिन्याला शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा करेल.

यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षाला केंद्राचे सहा हजार आणि महाराष्ट्र सरकारचे सहा हजार रुपये असे एकूण१२हजार रुपये जमा होतील.

केंद्र सरकार देशभरात पीएम किसान सन्मान निधी योजना राबवत आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी कुटुंबाला दरवर्षी 6 हजार रुपये इतकी आर्थिक मदत दिली जाते. दर 4 महिन्यांच्या अंतरानं 2 हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जातो.

आता राज्य सरकार केंद्र सरकारच्या या 6 हजार रुपयांमध्ये आणखी 6 हजार रुपयांची भर घालणार आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना प्रती वर्ष 12 हजार रुपये मिळतील. ही योजना अशी आहे.


 या योजनेचा लाभ कोण घेवू  शकणार?

 - पीएम किसान सन्मान निधी योजनेचे जे लाभार्थी आहे, त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.

जे शेतकरी पीएम किसान योजनेला पात्र आहेत ते शेतकरी या देखील योजनेला पात्र राहणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 

ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा लाभ मिळतो त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा लाभ देण्याचे राज्य शासनाने ठरवले आहे.

यानुसार ज्या शेतकऱ्यांच्या नावावर एक फेब्रुवारी 2019 पूर्वी जमीन आहे अशाच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

केंद्र सरकार जेवढे पैसे या लाभार्थ्यांना देतं, तितकेच राज्य सरकारही देणार आहे.


योजनेचा लाभ कोणाला मिळणार नाही? 

- कर भरणारे आयकरदाते शेतकरी, सरकारी नोकरदार आणि लोकप्रतिनिधींना म्हणजेच आमदार, खासदार इत्यादी अशांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही.


Namo shetkari mahasanman yojana

ही योजना कधी व कशी लागू होणार?

 – केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधीचा 13 वा हप्ता 27 फेब्रुवारी 2023 रोजी जारी करण्यात आला. 

या योजनेच्या कार्यपद्धतीनुसार, पुढचा हप्ता एप्रिल ते जुलै 2023 दरम्यान जारी केला जाईल.

आता केंद्राच्या पुढील हप्त्यातच राज्य सरकार त्यांच्या वाट्याची रक्कम टाकून शेतकऱ्यांना देणार, की वेगळी काही कार्यपद्धती अवलंबणार, हे मात्र या योजनेचा शासन निर्णय आल्यावरच स्पष्ट होईल.


राज्यातील किती शेतकरी योजनेचा लाभ घेणार?

- ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’चा लाभ 1 कोटी 15 लाख शेतकरी कुटुंबाना होणार, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. 

 देशपातळीचा विचार केल्यास गेल्या काही दिवसांपासून या योजनेतील लाभार्थ्यांनी संख्या खालावली आहे. 11 कोटींहून ती साडे आठ कोटींवर आली आहे.

त्यामुळे प्रत्यक्षात योजनेची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर राज्यातील किती शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल ते पाहावं लागणार आहे.


 या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावे?

 पीएम किसान सन्मान निधीचा 2 हजार रुपयांचा हप्ता ज्या बँक खात्यावर जमा होतो, ते बँक खातं आधार नंबर आणि मोबाईल नंबरशी लिंक करणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

राज्यात असे 12 लाख शेतकरी असे आहेत, ज्यांचं बँक खातं अजूनही आधार नंबर आणि मोबाईल नंबरशी लिंक नाहीये.

त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी ताबडतोड त्यांचं बँक खातं (ज्या खात्यात पीएम किसान योजनेचे पैसे येतात) आधार नंबर आणि फोन नंबरशी लिंक करून घ्यावं. नाहीतर त्यांना राज्य सरकारच्या योजनेचे पैसे मिळण्यास अडथळे येऊ शकतात.


योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्या बाबी बंधनकारक आहे? 

१ फेब्रुवारी २०१९ पूर्वीचा जमीनधारक शेतकरी पात्र

सन्मान निधी मिळवण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांना ई-केवायसी करावी लागेल

लाभार्थीने त्याच्या नावावरील मालमत्ता नोंदीची माहिती द्यावी

बँक खात्याला आधार लिंक करून घेणे बंधनकारक


योजनेची वैशिष्ट्ये कोणती ?

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता 12,000 रुपयांचा सन्मान निधी

प्रति शेतकरी, प्रति वर्ष 6000 रुपये राज्य सरकार देणार

केंद्राचे 6000 आणि राज्याचे 6000 असे 12,000 रुपये प्रतिवर्ष मिळणार

1.15 कोटी शेतकरी कुटुंबांना लाभ

6900 कोटी रुपयांचा भार राज्य सरकार उचलणार

Post a Comment

0 Comments