Find My Device App
मित्रांनो Google च्या 'Find My Device' अॅपमुळे आता तुम्ही हरवलेला किंवा चोरी झालेला फोन शोधू शकता, जरी तो इंटरनेटला जोडलेला नसला तरी.
याद्वारे आपणास खालील प्रश्नांची उत्तरे मिळतील..
मी माझे डिव्हाइस शोधा कसे वापरू?
सिमकार्डशिवाय चोरीला गेलेला फोन ट्रॅक करता येतो का?
Find My Phone वर तुम्ही डिव्हाइस मिटवता तेव्हा काय होते?
आपण Android फोन ट्रॅक करू शकता?
Find My Device' अॅप कसे वापरायचे आणि तुमचा Android phone कसा शोधायचा हे पाहुयात.
Google ने अलीकडेच 'Find My Device' अॅपमध्ये एक नवीन फीचर add केले आहे ज्यामुळे हरवलेले किंवा चोरी झालेले Android फोन, टॅब्लेट आणि हेडफोन शोधता येतात, जरी त्यांच्यामध्ये सिम कार्ड किंवा सक्रिय इंटरनेट कनेक्शन नसेल.
त्यासाठी Android-संचालित डिव्हाइसच्या Play Store वरून 'Find My Device' अॅप इंस्टॉल करावे.
हरवलेला किंवा चोरी झालेला Android फोन किंवा टॅब्लेट शोधणे झाले सोपे
Find My Device नेटवर्कमध्ये तुमचे डिव्हाइस कसे add करावे
1. Find My Device अॅप उघडा आणि तुमच्या Google खात्यात साइन इन करा.
स्क्रीनवर विचारले जाईल की तुम्हाला डिव्हाइस Find My Device नेटवर्कमध्ये जोडायचे आहे का?
2. स्क्रीनच्या तळाशी असलेल्या निळ्या बटणावर क्लिक करा ज्यावर 'Enter screen lock' लिहिले आहे. नंतर, तुम्हाला स्क्रीनवर दाखवलेल्या डिव्हाइसचा PIN enter करावा.
3. जर तुम्हाला Find My Network मध्ये डिव्हाइस जोडण्याची स्क्रीन दिसली नाही, तर 'Settings' अॅप उघडा, खाली स्क्रोल करा, 'Google' वर टॅप करा.
4. दिसणाऱ्या पृष्ठावर 'Find My Device' हा पर्याय क्लिक करा आणि 'Find your offline devices' वर टॅप करा. हा पर्याय डिफॉल्टनुसार 'Off' आहे, परंतु तुम्ही तो तुमच्या पसंतीनुसार बदलू शकता.
Find My Device वापरून तुमचा Android डिव्हाइस कसा शोधायचा?
1. Find My Device अॅप तुमच्या फोनवर उघडा आणि तुमच्या Google खात्याचा वापर करून साइन इन करा.
2. आता, तुम्हाला शोधायचे असलेले डिव्हाइस टॅप करा आणि तुम्हाला 'Find nearby' नावाचा पर्याय दिसेल.
3. असे केल्याने एक नवीन स्क्रीन उघडेल ज्यावर तुम्ही हरवलेल्या डिव्हाइसचे दिसू लागेल. तुम्ही जसे जवळ जाल तसा रिंग रंगाने भरू लागेल.
Find My Device app playstore link -
4. तसेच, जर तुम्हाला डिव्हाइस जवळ असूनही दिसत नसेल तर, स्क्रीनच्या तळाशी असलेले 'Play sound' बटण दाबा.
जर फोन तुमच्या जवळ नसेल, तर Find My Device अॅप वापरून शेवटचे ज्ञात स्थान location देखील तपासू शकता.
0 Comments