इको क्लबस फॉर् मिशन लाईफ अंतर्गत राज्यातील शाळांत राबवले जात आहेत विविध उपक्रम | eco clubs for mission life

eco clubs for mission life


इको क्लब फॉर मिशन लाइफ | eco clubs for mission life 

केंद्र शासनाच्या मिशन लाईफ या उपक्रमांतर्गत शैक्षणिक वर्ष 2024 - 25 या वर्षात राज्यातील सर्व शाळात इ 1 ली ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी विविध पर्यावरण संवर्धनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. 

सदरील उपक्रमामध्ये सर्व शाळांमधून विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये

आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारणे, 

शाश्वत अन्नप्रणाली स्वीकारणे, 

ई कचरा कमी करणे, 

कचरा कमी करणे, 

ऊर्जा बचत, 

पाणीबचत आणि 

प्लास्टिकचा वापर टाळणे 

या सात थीम वर आधारित शैक्षणिक कृती किंवा उपक्रमांचे आयोजन करण्याविषयी सूचित करण्यात आले आहे. 

सदरील उपक्रम हे 05 जून 2024 ते 11 जून 2024 या कालावधीत आयोजित करणे विषयी केंद्र शासनाचे निर्देश होते.

परंतु, राज्यातील शाळा उशिरा सुरू झाल्यामुळे सदरील उपक्रमांच्या आयोजन हे शाळा सुरू झाल्यानंतर करण्यात येणार आहे.

राज्यातील सर्व शाळांमधून हा उपक्रम राबवण्याची जबाबदारी विभागीय शिक्षण संचालक, जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक तसेच सर्व शाळांचे मुख्याध्यापक यांच्यावर सोपविण्यात आलेले आहे.

सदर कार्यक्रमात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचे फोटो व्हिडिओ अहवाल हे खाली दिलेल्या पोर्टल वरती अपलोड करावयाचे आहेत.

https://merilife.nic.in/

तसेच SCERT पुणे यांनी दिलेल्या खालील गुगलने लिंक वर सुद्धा सर्व शाळांनी माहिती भरावी असे सुचित करण्यात आलेले आहे.

https://docs.google.com/spreadsheets/d/1Kj5z0KGU7TVmEinZutzxc7cLmGPx5cmgCoCpz1kY/%20edit?usp=sharing 


इको क्लब फॉर मिशन लाइफ - अधिक माहितीसाठी संदर्भीय पत्र 


 

इको क्लब फॉर मिशन लाइफ अंतर्गत घ्यावयाची प्रतिज्ञा


इको क्लब फॉर मिशन लाइफ