UGC-NET परीक्षा रद्द |UGC NET examination cancelled
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे घेण्यात येणारी UGC-NET ही परीक्षा दुसऱ्याच दिवशी रद्द करण्यात आली आहे.
ही परीक्षा देशभरातील लाखो विद्यार्थ्यांनी दिली आहे. पेपर लीक झाल्याच्या संशयावरून केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने परीक्षाा रद्द केली आहे.
या वर्षांपासून राष्ट्रीय पात्रता परीक्षा (NET) लेखी स्वरूपात घेण्यात आली.
देशभरातील 317 शहरांमध्ये झालेल्या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या 11.21 लाख उमेदवारांपैकी अंदाजे 81% उमेदवार परीक्षेला हजर होते.
UGC-NET ही परीक्षा रद्द का झाली?
भारतीय सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर (I4C) च्या नॅशनल सायबर क्राइम थ्रेट ॲनालिटिक्स युनिटकडून परीक्षेत गोपनीयतेचा भंग झाल्याची माहिती शिक्षण मंत्रालयाला मिळाल्यामुळे सदरील परीक्षा रद्द करण्यात आली.
परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता आणि पावित्र्य टिकविण्यासाठी भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने UGC-NET जून 2024 ची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, असे मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.
नवीन परीक्षा घेण्याविषयी नंतर कळविण्यात येईल.
या प्रकरणाच्या सखोल चौकशी साठी हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (C.B.I.) कडे सोपविण्यात आले आहे.
UGC-NET परीक्षे कशासाठी घेतली जाते?
UGC-NET परीक्षा 'सहायक प्राध्यापक' म्हणून पात्रतेसाठी आणि विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये 'ज्युनियर रिसर्च फेलोशिप आणि असिस्टंट प्रोफेसर' म्हणून नियुक्त होण्याची पात्रता परीक्षा आहे.
UGC-NET परीक्षे कधी घेतली जाते?
ही परीक्षा NTA द्वारे संगणक-आधारित चाचणी (CBT) पद्धतीने वर्षातून दोनदा (जून आणि डिसेंबर) आयोजित केली जाते.
UGC-NET परीक्षेचे स्वरूप व गुणांकन पद्धती
UGC-NET परीक्षेच्या पेपर-I आणि पेपर-II मधील गुणांकनाच्या आधारावर सहाय्यक प्राध्यापकपदासाठी पात्र उमेदवारांचा विचार केला जातो.
ज्युनियर रिसर्च फेलोशिप (JRF) साठी पात्र असलेले लोक संशोधन करू शकतात किंवा असिस्टंट प्रोफेसरशिपसाठी अर्ज करू शकतात.
सहाय्यक प्राध्यापक पदासाठीचे नियम विद्यापीठ, महाविद्यालय किंवा राज्य नुसार वेगवेगळ्या असतात.
ही परीक्षा रद्द केल्यामुळे आणि त्यामध्ये चौकशी अंतर्भूत झाल्यामुळे ही परीक्षा देणाऱ्या हजारो विद्यार्थ्यावर त्याचा परिणाम होणार आहे.
0 Comments