मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-२ अभियान राज्यात राबविण्याचा निर्णय
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन यांचा शासन निर्णय -
शासन निर्णय क्रमांक: मुर्मअ २०२४/प्र.क्र.५२/एसडी-६
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
दिनांक: २६ जुलै, २०२४
उपक्रम सुरुवात
सन २०२३-२४ मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत 'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' हे अनोखे स्पर्धात्मक अभियान राबविण्यात आले होते.
या अभियानाने विद्यार्थी, शिक्षक, माजी विद्यार्थी, पालक, आणि शिक्षणप्रेमी नागरिकांना आकर्षित केले.
जवळपास ९५% शाळांमधील सुमारे २ कोटी विद्यार्थी या अभियानांतर्गत विविध उपक्रमात सहभागी झाले होते, ज्यामुळे हे अभियान यशस्वी ठरले.
मागील वर्षातील यशस्वी अनुभव
अभियानाच्या यशस्वीतेमुळे, शाळांना रोख रकमेच्या पारितोषिकांचे वितरण करण्यात आले आणि त्यांची तातडीची गरज भागविण्यासाठी निधी उपलब्ध झाला.
यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षकांमध्ये नवचैत्यन निर्माण झाले आणि अनेक सकारात्मक बदल घडले.
अभियानातील काही उपक्रमांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील झाली आहे.
दुसरा टप्पा :
सन २०२४-२५ मध्ये 'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा-टप्पा २' हे अभियान काही नवनवीन उपक्रमांसह राबविण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता आणि आता तो मंजूर करण्यात आला आहे.
शासन निर्णय:
1. अभियानाची व्याप्ती :
- राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांनी सदर अभियानात सहभागी होणे अपेक्षित आहे.
- शाळांची विभागणी शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा अशा दोन वर्गवारीत करण्यात येत आहे.
2. अभियानाची उद्दिष्टे :
- शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण, क्रीडा इत्यादी घटकांबाबत जागृती करून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासास चालना देणे.
- शासनाच्या ध्येय धोरणाशी सुसंगत अशा शालेय प्रशासनाच्या बळकटीकरणास चालना देणे.
- शालेय शिक्षणाच्या दृष्टीकोनातून सर्वाधिक महत्वपूर्ण असलेल्या शैक्षणिक संपादणूक या घटकाच्या वृद्धीस प्रोत्साहन देणे.
3. अभियानाचा कालावधी :
- २९ जुलै ते ०४ ऑगस्ट २०२४ हा कालावधी अभियानाच्या पूर्व तयारीसाठी असेल.
- ५ ऑगस्ट २०२४ रोजी औपचारिक कार्यक्रमाद्वारे अभियानाची सुरुवात होईल.
- ०५ सप्टेंबर २०२४ रोजी अभियानाचा कालावधी पूर्ण होईल.
- ०५ सप्टेंबर २०२४ ते १५ सप्टेंबर २०२४ या कालावधीत मूल्यांकनाची प्रक्रिया पार पाडण्यात येईल.
- त्यानंतरच्या सुयोग्य दिनांकास राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होईल.
4. अभियानाचे स्वरूप :
- पायाभूत सुविधा - ३३ गुण
- शासन ध्येय धोरण अंमलबजावणी - ७४ गुण
- शैक्षणिक संपादणूक - ४३ गुण
या निर्णयानुसार, राज्यातील सर्व शाळांना आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा आणि आपल्या शाळांचे विकास साधावा.
सारांश
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-२' अभियान महाराष्ट्रातील शाळांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. हे अभियान विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, शारीरिक आणि मानसिक विकासाला चालना देईल आणि त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक त्या सर्व घटकांवर लक्ष केंद्रित करेल.
0 Comments