Header Ads Widget

PM eVidya channel | पीएम ई विद्या शैक्षणिक वहिनी उपक्रमाचा लाभ राज्यातील विद्यार्थी, शिक्षक व पालक यांना होणार

पीएम ई विद्या शैक्षणिक वहिनी उपक्रमाचा लाभ राज्यातील विद्यार्थी, शिक्षक व पालक यांना होणार


PM eVidya शैक्षणिक वहिनी उपक्रमाचा लाभ राज्यातील विद्यार्थी, शिक्षक व पालक यांना होणार


महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाठी आनंदाची बातमी आहे. देशातील केरळ, आंध्र प्रदेश आणि गुजरात यांसारख्या राज्यांमध्ये यशस्वीरित्या राबविण्यात आलेल्या ई-शैक्षणिक साहित्याच्या प्रक्षेपण उपक्रमाचे अनुकरण करत महाराष्ट्र राज्यातही आता पाच शैक्षणिक DTH वाहिन्यांचा शुभारंभ करण्यात आला आहे.


शालेय शिक्षण विभागाने राज्यातील इयत्ता ९ वी ते १२ वी, शिष्यवृत्ती परीक्षांचे प्रशिक्षण, आणि सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास यासाठी आवश्यक असलेले ई-साहित्य प्रक्षेपण दिनांक २९ जुलै २०२३ पासून सुरू केले आहे. हे उपक्रम राज्यातील तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने तात्पुरत्या स्वरूपात कार्यान्वित करण्यात आले आहेत.


महाराष्ट्र राज्यासाठी PM eVidya या पाच शैक्षणिक DTH वाहिन्या मंजूर करण्यात आल्या असून, दिनांक ५ ते ७ जून २०२४ दरम्यान आयोजित कार्यशाळेत केंद्र शासनाच्या सूचनांनुसार यांचे प्रक्षेपण नियोजन करण्यात आले आहे. हे नियोजन सन २०२४-२५ अंतर्गत दिनांक १५ जून २०२४ ते ३० एप्रिल २०२५ दरम्यान लागू राहणार आहे.

PM eVidya वाहिनी वरील कार्यक्रमाचे वेळापत्रक 


राज्यातील तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने तात्पुरत्या स्वरूपात ५ PM eVidya शैक्षणिक DTH वाहिन्यांवर कार्यक्रम प्रक्षेपणाची कार्यवाही पूर्ण करून महिनावार नियोजन करण्यात आले आहे. सध्या दिनांक १५ जून २०२४ पासून भारत सरकारने BISAC संस्था, अहमदाबाद यांच्या मदतीने वरील ५ शैक्षणिक DTH वाहिन्यांवर कार्यक्रम प्रक्षेपणाची कार्यवाही सुरू केली आहे. या ५ शैक्षणिक वाहिन्या Dish TV, DTH TV आणि यूट्यूबच्या माध्यमातून उपलब्ध आहेत.


PM eVidya या पाच शैक्षणिक DTH वाहिन्या Dish TV, DTH TV आणि YouTube द्वारा उपलब्ध आहेत. हे चॅनेल विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असतील. आपण या वाहिन्यांवरील आशय बघून आपल्या बहुमूल्य अभिप्राय खालील ई-मेलवर देऊ शकता.



सन २०२४-२५ अंतर्गत इयत्ता १ ली ते १२ वी, सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास आणि इ. ५ वी, ८ वी शिष्यवृत्ती विषयासाठी दिनांक १५ जून २०२४ ते ३० एप्रिल २०२५ दरम्यान महिनानिहाय प्रपत्रे व मासिक वेळापत्रक करून कार्यक्रम प्रक्षेपित करण्यात येणार आहेत.

तरी आपण आपल्या कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त शिक्षक, विद्यार्थी, मुख्याध्यापक, पालक, अधिकारी व शिक्षण तज्ज्ञ यांना या ५ PM eVidya शैक्षणिक वाहिन्यांचा लाभ घेण्याचे आवाहन करावे. याबाबत काही अडचणी आल्यास खालील ई-मेलवर सविस्तर लिहिण्याचे आदेशित करण्यात येते.

सारांश 


हा PM eVidya उपक्रम राज्यातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. विद्यार्थ्यांनी या संधीचा अधिकाधिक लाभ घ्यावा आणि आपल्या शैक्षणिक प्रगतीसाठी हे साधन उपयोगात आणावे.


SCERT Pune चे पत्रक खालील pdf मध्ये दिले आहे.





Post a Comment

0 Comments