Header Ads Widget

शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धा 2023 चा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न | Prize distribution ceremony of Educational Video making Competition 2023

 

Prize distribution ceremony of  Educational Video making Competition 2023


दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धा 2023 चा पारितोषिक वितरण समारंभ 

राज्यस्तरीय व्हिडिओ निर्मिती स्पर्धा ही दर्जेदार ई साहित्य विकसित करण्यासाठी लाभदायक."- शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री श्री. दीपक केसरकर यांचे प्रतिपादन


  सध्याचे युग हे इंटरनेटचे युग आहे. ई लर्निंग हा त्यातीलच महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेली राज्यस्तरीय  व्हिडिओ निर्मिती स्पर्धा ही दर्जेदार ई साहित्य विकसित करण्यासाठी भविष्यात लाभदायक ठरेल ", असा आशावाद राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी येथे व्यक्त केला.


राज्यस्तरीय व्हिडिओ निर्मिती स्पर्धा : दर्जेदार ई-साहित्य निर्मितीची दिशा

तंत्रज्ञानाच्या आधुनिक युगात शिक्षण क्षेत्र देखील झपाट्याने प्रगत होत आहे. इंटरनेटच्या युगात ई-लर्निंग ही महत्त्वाची भूमिका बजावत असून, त्यासाठी दर्जेदार ई-साहित्याची आवश्यकता आहे. याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत राज्यातील शिक्षकांसाठी आयोजित केलेली 'व्हिडिओ निर्मिती स्पर्धा 2023' एक महत्वपूर्ण उपक्रम ठरला आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून शिक्षकांना तंत्रज्ञान स्नेही बनवून दर्जेदार ई-साहित्य निर्मितीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे.


कार्यक्रम कोठे व कधी झाला?

        शालेय शिक्षण व क्रीडा विभाग व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील शिक्षकांसाठी आयोजित  दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धा 2023 चा पारितोषिक वितरण समारंभ रविवार दिनांक 29 सप्टेंबर 2024 रोजी परिषदेच्या महात्मा फुले सभागृहात संपन्न झाला . यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन श्री केसरकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमासाठी कोण उपस्थित होते?

         शालेय शिक्षण व साक्षरता विभाग भारत सरकार, नवी दिल्ली येथील केंद्रीय सहसचिव अर्चना अवस्थी , राज्याचे  शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे,महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक आर विमला, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहूल रेखावार, योजना कार्यालयाचे संचालक महेश पालकर, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाचे संचालक  शरद गोसावी, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक संपत सूर्यवंशी, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे, परिषदेचे सहसंचालक रमाकांत काठमोरे, उपसंचालक डॉ.कमलादेवी आवटे, डॉ. माधुरी सावरकर, ज्योती शिंदे आदी मान्यवर या कार्यक्रमात उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे उद्घाटन आणि मंत्री श्री. दीपक केसरकर यांचे प्रतिपादन

         श्री केसरकर पुढे म्हणाले की गुणवंत विद्यार्थी घडवणे हे शिक्षणाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. तंत्रस्नेही शिक्षक हे काम प्रभावीपणे करू शकतात. तसेच अशा व्हिडिओ निर्मिती स्पर्धेद्वारे शिक्षण क्षेत्रातील तंत्रज्ञान सुधारण्यास मदत होणार आहे. तंत्रज्ञान युक्त अध्ययन अध्यापन प्रक्रिया वाढीस लागणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून उत्तमोत्तम व्हिडिओंचे संकलन करून त्याचा प्रत्येक शाळेमध्ये प्रसार व प्रचार केला पाहिजे. त्यातून शिक्षण प्रक्रिया ही प्रगल्भ होणार आहे. 

       नवीन राष्ट्रीय धोरणा NEP - 2020 चा उल्लेख करून श्री केसरकर म्हणाले की या धोरणानुसार सद्यस्थितीत व्यावसायिक शिक्षण व रोजगार निर्मिती करणारे शिक्षण हे आवश्यक आहे. त्यामुळेच राज्य शासनाने अभ्यासक्रमामध्ये व्यवसाय शिक्षण व कृषी या विषयांचा समावेश केला आहे कारण आपला देश हा कृषिप्रधान आहे. 

तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात तंत्रज्ञान सर्वदूर पोहोचविण्यासाठी व्हिडिओ निर्मिती स्पर्धा या दिशादर्शक ठरू शकतात.श्री केसरकर यांनी यावेळी माझी शाळा व माझी परसबाग या उपक्रमातील विजेत्यांचेही कौतुक केले.

प्रास्ताविक परिषदेचे संचालक श्री. राहूल रेखावार यांनी केले

       कार्यक्रमाचे प्रास्ताविक परिषदेचे संचालक राहूल रेखावार यांनी केले. श्री रेखावार यावेळी म्हणाले की अतिशय प्रदीर्घ काळ चालणाऱ्या व अटीतटीच्या स्पर्धेमध्ये पुरस्कार मिळवणे हे आव्हानात्मक आहे. 

त्यामुळे पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे अभिनंदन. शिक्षण क्षेत्रातील शिक्षक व विद्यार्थी हे दोन बिंदू आहेत. त्यांना प्रेरित करण्याचे व कार्यान्वित करण्याचे काम या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात आले आहे. स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या शिक्षकांचे काम हे अन्य शिक्षकांसाठी सुद्धा प्रेरणादायी आहे.

विजयी शिक्षकांचा सन्मान व बक्षीस वितरण

        व्हिडिओ निर्मिती स्पर्धेमधून राज्यस्तरावर विजयी झालेल्या 84 उमेदवारांचा यावेळी  सत्कार कऱण्यात आला. 

माझी शाळा माझी परसबाग या उपक्रमात विजयी ठरलेल्या शाळांचा सत्कारही यावेळी करण्यात आला.     

          राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेसह शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे सर्व विभाग, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील अधिकारी व प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी व्हिडिओ निर्मितीची स्पर्धेची अंमलबजावणी केली.


हेही वाचा - राज्यांतील शाळांत सुरक्षाविषयक नवीन नियम लागू - click here 


 स्पर्धेचा निकाल -

व्हिडिओ निर्मिती स्पर्धेमध्ये पुढील शिक्षकांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला -

1.पाटील राजश्री निंबा

2.पारडे दिपक सुरेश

3.मुदस्सिर अहमद  मुख़्तार अहमद

4.साबळे करूणादेवी सदाशिव

5.गाडेकर सचिन पांडूरंग

6.जोशी योगेश मधुकर

7.वनवे विजय चंद्रकांत

8.गोरे शितल विठ्ठल

9.सपकाळे सिध्दार्थ सोमा

10.कोरे विवेक विलासराव

11.खोब्रागडे शैलेंद्र दिलीप

12.देसाई सचिन कुंडलिक

13.भिसे किशोर अण्णाजी

14.माने गणेश दऱ्याप्पा

15.गुरव रविंद्र अरुण

16.जोशी हेमाली प्रदीप

17.कैथवास रविकुमार लक्ष्मीनारायण

18.राजपूत ईश्वर रघुनाथ

19.मुद्राळे विधी वैभव

20.गायकवाड संजय लक्ष्मण

21.मेटा सुष्मिता बिकाश

22.पावबाके विजय बाळासाहेब

23.प्रधान नलिनी संजय

24.साळुंखे तुषार श्रीरंग

25.पाटील पूजा सुनिल

26.देशमुख स्वाती मधुकर

27.माली ममता शत्रुघ्न

28.झांबरे स्नेहल सुबोध


शिक्षकांसाठी दर्जेदार व्हिडियो निर्मिती स्पर्धा 2023- तालुका व जिल्हास्तर निकाल पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

तालुका स्तरावरील निकाल येथे पहा 


जिल्हा स्तरावरील निकाल येथे पहा 


राज्य स्तरावरील निकाल येथे पहा  


स्पर्धा आयोजना मागची पार्श्वभूमी

        शिक्षकांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण होऊन ई-साहित्य निर्मितीची चळवळ उभी रहावी; यासाठी  राज्यातील  शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षक प्रशिक्षक यांच्यासाठी तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मितीची  स्पर्धा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आली.   

स्पर्धा आयोजनाची कार्यपद्धती काय होती

राज्यांतील 408 तालुक्यात, 36 जिल्ह्यात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर विषय व गटनिहाय प्रथम तीन क्रमांक निवडण्यासाठी तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर क्षेत्रीय अधिकारी व पुरस्कार प्राप्त शिक्षक यांची समिती गठीत करून अंतिम मूल्यमापन करण्यात आले. शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धा 2023 साठी 36 जिल्ह्यातील 408 गटातील 18221 उमेदवारांचे पोर्टलद्वारे अर्ज प्राप्त झाले . 

 व्हिडिओ निर्मितीचे महत्त्व आणि भविष्यातील दिशा

व्हिडिओ निर्मिती स्पर्धा शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचे महत्त्व अधोरेखित करते. विविध विषयांवर आधारित दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मितीमुळे शिक्षण अधिक प्रभावी होत आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत शिक्षण क्षेत्रात सुधारणा करताना तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. व्यावसायिक शिक्षण व रोजगार निर्मिती करणारे शिक्षण महत्त्वाचे ठरत असल्याने राज्य सरकारने अभ्यासक्रमात व्यावसायिक शिक्षण आणि कृषी या विषयांचा समावेश केला आहे.


शिक्षण क्षेत्रातील नवीन दृष्टिकोन

तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे शिक्षण अधिक परिणामकारक बनले आहे. राज्यस्तरीय व्हिडिओ निर्मिती स्पर्धा हे एक पाऊल आहे, ज्यामुळे शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रसार होईल. शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या अशा स्पर्धांमुळे त्यांना त्यांच्या ज्ञानाचा आणि कौशल्यांचा विकास करण्याची संधी मिळते. यामुळे शिक्षण प्रक्रिया अधिक प्रगत आणि प्रभावी बनते.

शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केलेल्या अशा स्पर्धा भविष्यात शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बदल घडवतील आणि शिक्षणाचा दर्जा उंचावतील, असा विश्वास या समारंभात व्यक्त करण्यात आला.



Post a Comment

0 Comments