शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण (SEAS - PARAKH) 2024 चे दिनांक 04 डिसेंबर 2024 रोजी होणार निवडक शाळांत आयोजन
दिनांक 04 डिसेंबर 2024 रोजी राज्य शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण (SEAS) २०२४- PARAKH राज्यातील काही निवडक शासकीय, शासकीय अनुदानित व खाजगी मध्ये इयत्ता ३ री, ६ वी व ९ वी मधील विद्यार्थ्यासाठी आयोजित करण्यात येणार आहे.
त्या अनुषंगाने राष्ट्रीय शैक्षणीक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी सदर उपक्रमाचे वेळापत्रक दिलेले आहे.
अंतर्भूत इयत्ता
अंतर्भूत विषय
प्रश्नपत्रिका चे स्वरूप कसे असेल?
- प्रश्नपत्रिका चे सरूप हे बहुपर्यायी वस्तुनिष्ठ उच्चस्तरीय विचारात्मक चिंतनात्मक उपयोजनात्मक अशा स्वरूपाच्या असेल.
- तसेच प्रश्न हे आधीच्या स्तराच्या अभ्यासक्रमावर व अध्ययन निष्पत्ती वर आधारित असतील.
आयोजन कालावधी
राज्यात सदर सर्वेक्षण दिनांक 04.12.2024 रोजी करण्यात येणार आहे.
आयोजक
सर्वेक्षणासाठी शाळांची निवड ही मनुष्यबळ विकास मंत्रालय व NCERT नवी दिल्ली यांच्यामार्फत करण्यात येणार आहे.
या कालावधीत सदर सर्वेक्षणासाठी निवडलेल्या शाळांमध्ये इतर कोणत्याही उपक्रमाचे आयोजन करण्यात येऊ नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
परख राष्ट्रीय सर्वेक्षण 2024 साठी निवड झालेल्या शाळेतील मुख्याध्यापक, त्या त्या वर्गातील शिक्षक व FIs यांना अधिक महितीसाठी...
Youtube link
सदर सर्वेक्षणात जिल्ह्याची संपादणूकता वाढविण्याच्या दृष्टीकोणातून खालील प्रमाणे कार्यवाही करण्यात येणार आहे.
१. जिल्ह्यातील सर्व शाळांना परख सर्वेक्षणाच्या स्वरूपाविषयी माहिती सविस्तरपणे खाली देण्यात आली आहे.
२. त्या अनुषंगाने राज्यात सदर सर्वेक्षण अंमलबजावणी दिनांक ०४.१२.२०२४ रोजी करण्यात येणार आहे. सर्वेक्षणासाठी शाळांची निवड ही मनुष्यबळ विकास मंत्रालय व NCERT नवी दिल्ली यांच्यामार्फत करण्यात आली आहे. या कालावधीत सदर सर्वेक्षणासाठी निवडलेल्या शाळांमध्ये इतर कोणत्याही उपक्रमाचे आयोजन करण्यात येऊ नये.
३. सर्वेक्षण दिनांक ०४.१२.२०२४ रोजी राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शाळा, खाजगी अनुदानित, खाजगी विना अनुदानित व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या यादृछिक पद्धतीने निवडलेल्या शाळांत घेण्यात येणार आहे.
४. सदर सर्वेक्षण हे दिनांक ०४.१२.२०२४ रोजी प्रत्यक्ष सर्वेक्षण होणार असल्याने सदर कालावधीत निवड झालेल्या शाळांमधील निवडण्यात आलेल्या वर्गातील १००% विद्यार्थ्यांना उपस्थित ठेवण्याबाबत सूचित करण्यात यावे.
५. ज्या शाळांना या कालावधीमध्ये सुट्टी आहे अशा शाळांमधील ज्या वर्गाचा समवेश सर्वेक्षण साठी झाला असेल त्या वर्गाला सर्वेक्षणाच्या दिवशी उपस्थित ठेवण्याबाबत सूचित करण्यात यावे.
६. शाळा सकाळ आणि दुपार सत्रात भरत असतील तरीही संबंधित शाळेतील निवड झालेल्या इयत्तेसाठी सर्वेक्षण कालावधीत सर्वेक्षणाच्या खालील नियोजित वेळेनुसार शाळा भरविण्यात यावी.
वेळापत्रक
७. निवड झालेली शाळा जर बंद झाली असेल, तर तसा अहवाल CBSE निरीक्षक नमूद करतील. तशा सूचना जिल्हा स्तरावरून CBSE निरीक्षकांना देण्यात याव्यात जेणे करून CBSE निरीक्षक त्या शाळेवर जाणार नाही.
मात्र अहवाल तयार करून जिल्हा समन्वयक CBSE यांचेकडे जमा करावा.
८. सर्वेक्षणाच्या दिवशी जर काही शाळेत विद्यार्थ्यांची संख्या ५ पेक्षा कमी असेल तसेच विशेष मुलांची शाळा असेल अशा परिस्थितीत CBSE निरीक्षक व FI यांनी शाळा मुख्याध्यापकांसोबत संपर्क करून त्याबाबतचा अहवाल तयार करून तो दोन्ही जिल्हा समन्वयक याना द्यावा.
९. ज्या शाळांची निवड झाली आहे त्या शाळांना सर्वेक्षण संदर्भातील कार्यवाहीबाबत लेखी पत्र देण्यात यावे.
१०. रात्र शाळांची निवड झाली असेल व त्या शाळांच्या निवड झालेल्या वर्गांना सकाळच्या सत्रात येणे शक्य असेल अशा शाळांना वरील वेळापत्रकाप्रमाणे कळवावे अन्यथा त्यांच्या वेळेनुसार सर्वेक्षण आयोजित करावे. याबाबत संबंधित निरीक्षक व क्षेत्रीय अन्वेषक यांना अवगत करावे.
११. शाळा विशेष गरजा असणाऱ्या मुलांची (विशेष शाळा) असेल अशा परिस्थितीत या विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या सुविधा नियमाप्रमाणे देऊन (सहायक/मदतनीस / वाढीव वेळ) सर्वेक्षण घ्यावे. तसेच क्षेत्रीय अन्वेषकांना या मुलांना प्रश्नांचे अर्थ समजावून देण्यापर्यंत मदत करण्यात यावी अशा सूचना देण्यात याव्यात.
१२. शाळांचे माध्यम व सर्वेक्षणाकरिता निश्चित करण्यात आलेल्या माध्यमात बदल असेल तर अशा शाळेत सर्वेक्षणावेळी क्षेत्रीय अन्वेषकांना या मुलांना प्रश्नांचे अर्थ समजावून देण्यापर्यंत मदत करण्याबाबत सूचना द्यावी.
सर्वेक्षणाच्या अनुषंगाने करावयाची पूर्वतयारीः
१. OMR भरण्याचा सराव घेण्यात यावा.
२. चाचणीपूर्वी NAS २०१७, ETAS, MTAS सर्वेक्षण मधील प्रश्नांचा सराव घेण्यात यावा. तसेच SLAS व PAT मधील प्रश्नांचा सराव घ्यावा.
३. विद्यार्थ्याच्या सरावासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संकेतस्थळावर सराव प्रश्नपेढी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
शाळाभेटः
सर्वेक्षण कालावधीत राष्ट्रीय व राज्य स्तरावरून काही शाळा भेटी करण्यात येणार आहेत. तसेच जिल्हा स्तरावरून जिल्हा स्तरीय अधिकारी प्राचार्य, वरिष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्याता DIET, शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक च उपशिक्षणाधिकारी यांच्या भेटींचे होणार आहेत. करावे.
PARAKH 2024 : शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण (SEAS) २०२४ आयोजनाचे उद्देश
सदर सर्वेक्षणातून राज्याची शैक्षणिक स्थिती कळणार आहे. तसेच जिल्हा व तालुका स्तरावरील शिक्षणाची सध्यस्थिती समजणार आहे.
जिल्ह्याची संपादणूक वाढविण्याच्या दृष्टीकोनातून जिल्हा, तालुका, केंद्र, व शाळास्तरावर योग्य त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
जिल्हा, केंद्र, तालुका स्तरावर SEAS संदर्भात कार्यवाही करताना जिल्हा समन्वयक म्हणून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी प्राथमिक / माध्यमिक यांनी समन्वयाने सदर उपक्रमाचे नियोजन व अमलबजावणी करणार आहेत.
सरावासाठी -
NAS, SLAS, ETAS, MTAS, PAT च्या प्रश्नपत्रिकांची लिंक
● क्षेत्रीय अन्वेषक यांची नियुक्ती पुढीलप्रमाणे होणार आहे
१. क्षेत्रीय अन्वेषक (FI) प्रती शाळा ०१ याप्रमाणे एका शाळेला एक याप्रमाणे एक क्षेत्रीय अन्वेषक असेल.
२. क्षेत्रीय अन्वेषकांची नियुक्ती करताना डी. एल. एड मधील विद्यार्थी, बी.एड. मधील विद्यार्थी तसेच पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट्स, मास्टर ऑफ सोशल वर्क स्टुडन्ट, सेवानिवृत्त शिक्षक, ११ वीतील विद्यार्थी यांमधून प्राधान्याने निवडले जातील.
३. जर वर दिलेल्या मधून संख्या कमी पडली तरच फिल्डवरील शिक्षकांची नियुक्ती करण्यात येईल. परंतु ते निवडण्यात आलेल्या शाळेमधील व लगतच्या शाळेतील शिक्षक नसतील.
PARAKH विषयी अधिक जाणून घेऊ या.
राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (NCERT) ने भारतातील पहिले राष्ट्रीय मूल्यांकन नियामक प्राधिकरण,
PARAKH - Performance Assessment, Review, and Analysis of Knowledge For Holistic Development
यांना अधिसूचित केले आहे, ज्याचे उद्दिष्ट हे देशातील सर्व बोर्डांसाठी मूल्यांकन मार्गदर्शक तत्त्वे ठरविणे हे आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP)-2020 अंमलबजावणीचा एक भाग
परख हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP)-2020 च्या अंमलबजावणीचा एक भाग म्हणून तयार केले गेले आहे. ज्यामध्ये नवीन मूल्यांकन पद्धती आणि नवीनतम संशोधनाबाबत राज्य अथवा केंद्रीय बोर्डांना सल्ला देण्यासाठी आणि त्यांच्यातील सहकार्यांला प्रोत्साहन देण्यासाठी PARAKH ची निर्मिती करण्यात आली आहे.
- PARAKH हे NCERT चा एक घटक म्हणून काम करणार आहे.
- नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे (NAS) आणि स्टेट अचिव्हमेंट सर्व्हे (SEAS) यांसारख्या नियतकालिक चाचण्या घेण्याचे कामही PARAKH करणार आहे.
- PARAKH मुख्यतः मूल्यांकन क्षेत्रांवर कार्य करणार आहे.
- मोठ्या प्रमाणात मूल्यांकन
- शाळा-आधारित मूल्यांकन
- परीक्षा सुधारणा
PARAKH चे उद्दिष्ट:
- एकसमान निकष आणि मार्गदर्शक तत्त्वे: भारतातील सर्व मान्यताप्राप्त शाळा मंडळांसाठी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन आणि मूल्यमापनासाठी मानदंड, मानके आणि मार्गदर्शक तत्त्वे तयार करणे.
- 21 व्या शतकातील महत्वाचे कौशल्य पूर्ण करण्यासाठी ते शालेय मंडळांना त्यांचे मूल्यांकन पद्धती बदलण्यास मदत करणार आहे.
- PARAKH राज्य आणि केंद्रीय बोर्डांमध्ये एकसमानता आणणार आहे, जे सध्या मूल्यांकनाच्या विविध निकषांचा उपयोग करतात, ज्यामुळे मूल्यमापन व गुणांमध्ये मोठया प्रमाणात तफावत दिसून येते.
- सीबीएसई शाळांमधील त्यांच्या समवयस्कांच्या तुलनेत काही राज्य मंडळांच्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयीन प्रवेशादरम्यान गैरसोय होत असते ही गैरसोय पुढे होऊ नये या सर्व येणाऱ्या समस्येचे निराकरण करण्यात मदत होणार आहे.
- PARAKH च्या माध्यमातून शालेय शिक्षणाच्या सर्व स्तरांवरील चाचण्यांचे आराखडा, विश्लेषण आणि अहवाल देण्यासाठी तांत्रिक निकष विकसित होणार आहेत.
- पारख शिक्षणासाठी सर्वसमावेशक, सहभागी आणि सर्वांगीण दृष्टीकोन सुलभ करण्याचे उद्दिष्ट ठेवते, जे क्षेत्रीय अनुभव, अनुभवजन्य संशोधन, सहभागीचे अभिप्राय, तसेच सर्वोत्तम पद्धतींमधून शिकलेले धडे विचारात घेते.
- पारख हे शिक्षण अधिक वैज्ञानिक दृष्टिकोनातून प्रगतीशील बदल आहे.
परख राष्ट्रीय सर्वेक्षण (NAS) 4 डिसेंबर 2024 करीता सरावासाठी क्षमताधारीत प्रश्नपेढी
परख राष्ट्रीय सर्वेक्षण (NAS) 4 डिसेंबर 2024 रोजी* संपूर्ण राज्यामध्ये यादृच्छिक पद्धतीने होणार आहे. त्यासाठी राज्यातील सर्व माध्यमाच्या,सर्व व्यवस्थापनाच्या काही निवडक शाळा निवडून इयत्ता तिसरी , सहावी व नववीच्या विद्यार्थ्यांची भाषा गणित, विज्ञान व सामाजिक शास्त्र या विषयांमधील संपादणूक पडताळणी केली जाणार आहे.
त्यासाठी पूर्वतयारीचा भाग म्हणून इयत्ता ३री, ६वी व ९वी साठी विषय निहाय क्षमताधारित प्रश्नपेढी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे www.maa.ac.in वेबसाईटवर देण्यात आलेली आहे.
या प्रश्नपेढीच्या आधारे संबंधित सर्वेक्षणाबाबत विद्यार्थ्यांचा सराव होईल याबाबत सनियंत्रण करावे.
सदर प्रश्नपेढी पाहण्यासाठी येथे click करा..
PARAKH विषयी अधिक माहिती साठी PARAKH च्या पोर्टलला भेट द्या. Click here
0 Comments