कोणत्या रोगावर कोणती आसने उपयोगी पडतात? त्यांचा कसा उपयोग होतो? त्याविषयी संपूर्ण माहिती
आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत, वेगवेगळ्या शारीरिक व मानसिक आजारांनी ग्रस्त होणे अपरिहार्य झाले आहे. औषधोपचारांबरोबर योगासने केल्याने शरीर निरोगी राहते आणि मनाला शांती मिळते. चला, वेगवेगळ्या आजारांवर कोणती योगासने उपयुक्त आहेत आणि त्याचा शरीरावर कसा परिणाम होतो ते जाणून घेऊया.
अजीर्ण -
अजीर्ण म्हणजे खाल्लेले अन्नपदार्थ न जिरणे वा पचणे. आजच्या यंत्रयुगात, धकाधकीच्या काळात, वाढत्या महागाईशी तोंडमिळवणी करण्याकरिता, सकाळपासून रात्रीपर्यंत धावपळीत जीवन-कष्ट उपसून कंठावे लागते.
हे करताना खाल्लेले अन्नपदार्थ अंगी लागत नाहीत, पचत नाहीत, मानसिक शांतीही लाभत नाही.
उपयुक्त आसने
जानुशिरासन, शीर्षासन, मत्स्येंद्रासन, चक्रासन, सर्पासन, पश्चिमोत्तानासन, सर्वांगासन, ऊर्ध्वबद्ध पद्मासन, गर्भासन आणि बद्धपद्मासन, ही आसने करावीत.
फायदे
आमवात व नळाश्रित वायू -
अपचित अन्नरसामुळे आमवात उत्त्पन्न होतो.
उपयुक्त आसने
त्यावर इलाज म्हणून पद्मासन, चक्रासन, पश्चिमोत्तानासन, मत्स्येंद्रासन, मयुरासन ही आसने करून, शेषटी उर्ध्वसर्वांगासन करावे, म्हणजे हा विकार नाहीसा होतो.
फायदे :
या आसनांमुळे सांधेदुखी कमी होते, वातदोष नियंत्रित होतो, आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात.
परिणामशूल -
खाल्लेले अन्न जिरत असताना होणारा शूल, म्हणजे परिणाम शूल.
उपयुक्त आसने
यावर इलाज म्हणजे, यावर औषधे घेत असताना, डॉक्टरच्या वा तज्ज्ञाच्या सल्ल्याप्रमाणे, मत्स्येंद्रासन, मयुरासन, शीर्षासन, पश्चिमोत्तानासन आणि पादहस्तासन, ही आसने करावीत.
फायदे :
या आसनांमुळे पचनसंस्थेतील तणाव कमी होतो आणि पचनक्रिया सुरळीत होते.
अग्निमांद्य -
हा पचनेंद्रियांचा रोग होय. जठारामध्ये अन्नरसावरील क्रिया नीट होत नसली व यकृताचे कार्य नीट होत नसले, म्हणजे चांगली भूक न लागणे, करपट ढेकरा येणे, जास्त पाद सुटणे, हे प्रकार घडतात.
यावर इलाज म्हणजे अंतरावयव कार्यक्षम करणे व उत्सर्जन सुधारणे.
या रोगाच्या मनुष्याने भरपूर पाणी प्यावे व जेवताना पाणी पिऊ नये.
उपयुक्त आसने
पश्चिमोत्तानासन, योगमुद्रा, धनुरासन, शलभासन, उड्डीयानबंध, नौली
फायदे
या आसनांनी जठर, यकृत यावर इष्ट अंतर्दाब पडून, रक्ताचा पुरवठा भरपूर होऊन, पचनकार्य सुधारते.
या आसनांमुळे जठर सशक्त होते, यकृताचे कार्य सुधारते, आणि पचनसंस्था क्रियाशील राहते.
बद्धकोष्ठता -
- बद्धकोष्ठता म्हणजे शौचास न होणे. हा रोग सर्व रोगाचे मूळ कारण आहे.
अजीर्ण, अग्निमांद्य व बद्धकोष्ठता, हे रोग परस्परांशी संबंधित असे आहेत. मनुष्याने सेवन केलेल्या अन्नपदार्थाचे पचन होऊन, न पचलेला भाग व तसेच शरीरातील इतर निरुपयोगी पदार्थ बाहेर टाकणे आवश्यक असते.
परंतु तसे न होता, हळूहळू हा रोग बळावतो व पुढे अजिबात शौचास न होणे, डोके दुखणे, पोट दुखणे आदि प्रकार सुरू होऊन, इतर रोगही होऊ लागतात.
उपाय
यासाठी उषःपान करून, आसनांचे प्रयोग करणे चांगले. पहाटे लवकर उठून नाकाने व तोंडाने कोमट पाणी पिणे आवश्यक असते. तांब्याच्या भांड्यात रात्री झोपताना स्वच्छ ताजे पाणी भरून घेऊन, झाकून ठेवावे व सकाळी प्राशन करावे. उषःपान केल्यावर १५-२० मिनिटे तरी अंथरुणावर पडून रहावे.
उपयुक्त आसने
सर्पासन, सर्वांगासन, मयूरासन, मत्स्येंद्रासन, पश्चिमोत्तानासन, धनुआसन, योगमुद्रा, उड्डीयानबंध व नौली, या आसनांचा चांगला उपयोग होतो.
फायदे -
या आसनांनी आतड्यांतील स्नायूंच्या चलनवलनास मदत होऊन, त्याने शौचास साफ होते. आसने रोज दीर्घकाळ केल्याने, एकांदिक महिन्यात बद्धकोष्ठावर परिणाम घडून हा रोग जातो.
लठ्ठपणा -
लठ्ठपणा हा रोग स्निग्ध पदार्थांच्या अतिसेवनाने होतो; तर काही वेळा पचनक्रियेत होणाऱ्या बदलाने होतो. खाल्लेल्या पदार्थांचे चरबीत अधिक प्रमाणात रूपांतर घडत जाऊन, त्याची चरबी बनते. त्यामुळे लठ्ठपणा वाढतो.
लठ्ठपणामुळे रक्ताभिसरण कमी होऊ लागते व त्यामुळे घाम अधिक प्रमाणात येतो. हृदय सशक्त रहात नाही.
उपाय
हा विकार औषधे व उपवास, यांच्याबरोबरीने आसने केल्यास जाऊ शकतो.
उपयुक्त आसने
यासाठी पुढील आसने करावीत. पद्मासन, सर्वांगासन, हलासन, मत्स्यासन, पश्चिमोत्तानासन, शीर्षासन ही आसने करावीत.
फायदे
या आसनांनी अन्नपदार्थाचे योग्य प्रकारे पचन होऊन पचलेल्या अन्नाचे रक्तात रूपांतर होते. रक्ताभिसरण सुधारते.
परिणामी चरबी बनण्याचे प्रमाण घटते. यामुळे थोड्याशा श्रमाने येणारा थकवा नाहीसा होऊन, घाम येणेही कमी होते.
अशा रीतीने लठ्ठपणावर परिणाम होऊन, हा विकार कायमचा नाहीसा होतो.
डोकेदुखी -
डोकेदुखी हा विकार शौचास साफ न झाल्याने, अशक्तपणाने, शरीर इतर रोगांच्या अधीन झाल्याने होतो. जठर व आतडी, यांमध्ये शरीरावश्यक व शरीरानावश्यक पदार्थांचा अधिक साठा झाल्यावर, तो भाग रक्तवाहिन्यांमार्फत रक्ताभिसरणात येतो. यामुळे डोके दुखू लागते.
उपयुक्त आसने
त्यावर उपाय म्हणून रिकाम्या पोटी हलासन सर्वांगासन, मत्स्यासन, शवासन, शीर्षासन ही आसने नियमित करावी.
फायदे
भरपूर पाणी प्यावे, डोके मालिशही करावे. शक्यतो ही आसने डोकेदुखीच्या वेळात वा काळात करू नयेत. त्यामुळे डोकेदुखीवर परिणाम होऊन, हा विकार कायमचा जाऊ शकतो.
छाती दुखणे -
छाती दुखणे हा विकार फुप्फुसास व्यवस्थितपणे प्राणवायूचा पुरवठा न झाल्याने होतो. यामुळे रक्तास प्राणवायूचा पुरवठाही नीटपणे होत नाही.
उपयुक्त आसने
यावर उपाय म्हणून पुढील आसने, म्हणजे मत्स्यासन, हलासन, उज्जायी व शवासन करावीत.
फायदे
याने छातीच्या स्नायूंना व श्वसनाच्या मार्ग स्नायूना योग्य व्यायाम होतो. परिणामी प्राणवायूचा पुरवठा व्यवस्थित होतो व हा विकार नाहीसा होतो.
पडसे -
पडसे हा विकार शरीरप्रकृती अशक्त झाल्याने, हवामानातील थोड्याशा फरकाने होतो. काहींना हमखास हा विकार थंड पदार्थांचे सेवन केल्याने होतो, तर काहींना वर्षभर मधूनमधून याचा त्रास होत असतो.
उपयुक्त आसने
यावर उपाय म्हणून, पुढील आसने करावीत. शीर्षासन, हलासन व उज्जायी प्राणायाम व भस्त्रिका प्राणायाम करावेत.
तसेच धौतीतील उषःपान व नेती यानेही पडशाचा विकार नाहीसा होतो.
फायदे :
या आसनांमुळे श्वसनसंस्था बळकट होते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
कंबर व पोटदुखी -
कंबर व पोटदुखी बहुतेक बद्धकोष्ठतेनेच होते. यासाठी उपाय म्हणून, बद्धकोष्ठतेवर परिणामकारक उपाय करावेत.
उपयुक्त आसने
सौम्य रेचक घेऊन सर्पासन, सर्वांगासन, मयूरासन, मत्स्येंद्रासन, चक्रासन व शेवटी शीर्षासन करावे म्हणजे हा विकार कायमचा नाहीसा होतो.
फायदे:
या आसनांमुळे पचनसंस्थेवरील ताण कमी होतो आणि कंबर व पोटदुखी कमी होते.
वीर्यदोष -
आधुनिक राहणीमानाने व अदृश्य आकर्षणाला बळी पडून, मनाचा तोल जाऊन अज्ञानापोटी काही वाईट गोष्टी घडतात. त्याचे शरीरावर परिणाम होऊन हा विकार उद्भवतो.
उपयुक्त आसने
यावर उपाय म्हणून मनावर संयम ठेवून पुढील आसने नियमित करावीत : हलासन, उग्रासन मत्स्यासन, पादांयुष्ठासन, उड्डीयानबंध व नौली आसने करावीत.
मात्र हे करताना प्रथम स्वतःचे दोष जाणून ते मनातून, आचारातून विचारांतून घालवून टाकण्याच्या दृष्टीने स्वतःवर बंधने घालून याचे काटेकोररीत्या पालन करणे आवश्यक आहे. यामुळे वीर्यदोष हा विकार नाहीसा होतो.
फायदे:
या आसनांमुळे मनःशांती लाभते, शरीर शुद्ध होते, आणि आत्मविश्वास वाढतो.
मलेरिया -
मलेरिया हा रोग एक प्रकारचे डास चावल्याने मनुष्याच्या शरीरात रक्तात पॅरासाईट गेल्याने होतो. या रोगाची लक्षणे म्हणजे खूप थंडी वाजणे, ताप येणं आणि घाम येऊन ताप उतरणे ही होत. हा रोग मुख्यतः रक्तातील घटकांची रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याने होतो.
उपयुक्त आसने
यावर उपाय म्हणून पुढील आसने करावीत. मत्स्यासन, पश्चिमोत्तानासन, भुजंगासन, सर्वांगासन, हलासन ही आसने करावीत.
फायदे
याने रक्तशुद्धी, यकृत कार्यक्षम होऊन हा विकार नाहीसा होतो.
या आसनांमुळे रक्तशुद्धी होते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
ताप नसेल अशा वेळी वरील आसने करावीत.
रक्तदाब -
रक्तदाब हा विकार कमी रक्तदाब वा अधिक रक्तदाब अशा प्रकारचा असतो. साधारणपणे मध्यम वयापासून पुढे हा विकार उद्भवतो.
वेळीच योग्य उपाय न केल्यास मेंदूतील रक्त- वाहिन्या फुटणे, कोमा अवस्थेसारखा उपद्रव होतो.
रक्तदाब निरोगी मनुष्यास कमीत कमी ७०-८० व जास्तीत जास्त १२०- १४० युनिट असतो. जेव्हा रक्तदाब वरील मर्यादेहून अधिक वा कमी असेल अशा मनुष्यास रक्तदाबाचा विकार असतो.
उपयुक्त आसने
यासाठी उपाय म्हणून दीर्घश्वसन व शवासन करून त्यानंतर योगमुद्रा, मत्स्यासन, उष्ट्रासन, नौकासन, ताडासन ही आसने करावीत.
रक्तदाबाचा विकार असणाऱ्यांनी शीर्षासन कधीही करू नये.
वक्रासन, हलासन, उज्जायी प्राणायाम यांचाही या विकारावर चांगला उपयोग होतो.
फायदे:
या आसनांमुळे हृदयाचे कार्य सुधारते, रक्तदाब नियंत्रित राहतो, आणि ताण कमी होतो.
हृदयविकार -
हृदयविकार हा बौद्धिक श्रम करणाऱ्याला अधिक प्रमाणात होतो. कारण अशा मनुष्याच्या छातीवर अशा प्रकारच्या कामाचा बोझा पडतो.
हृदयविकारात हृदयाला कमी प्रमाणात रक्त- पुरवठा होणे, छातीमध्ये दुखणे, कारोनरी या रक्त पोहोचविणाऱ्या नाडीची निर्बल स्थिती असणे हे संभवते.
डॉक्टरी इलाजाबरोबर इतर गोष्टी, पथ्यपाणी पाळावे लागते. तेव्हा हा विकार तपासणीत लक्षात आल्यावर ताबडतोब उपाययोजना सुरू करावी.
उपयुक्त आसने
योग्य व्यक्तीचा सल्ला घेऊन दीर्घश्वसन व शवासन यांचा अभ्यास प्रथम दिवसातून एक वेळा, पुढे ८-१० दिवसांनंतर दोन वेळा करावा.
मात्र हे करताना व केल्याने थकवा वा निरु लेत्साह वाटू देऊ नये. तसे असेल तर शवासनच दोन वेळा फक्त करत रहावे.
पुरेशी सुधारणा जाणवू लागल्यावर साधारणपणे दोन महिन्यांनी शवासन ५ मिनिटे करून पुढे पुढीलप्रमाणे आसने करावीत-
- पश्चिमोत्तानासन - १० ते १५ सेकंद
- भुजंगासन - १० सेकंद
- योगमुद्रा - १० ते ३० सेकंद
- मत्स्यासन - १० ते ३० सेकंदा
- भस्त्रिका प्राणायाम - १० ते ४० वेळा
- दीर्घश्वसन - ३ ते १० वेळा
- शवासन - २ ते ५ मिनिटे
फायदे
या आसनांमुळे हृदय सुदृढ होते, रक्ताभिसरण सुधारते, आणि थकवा कमी होतो.
याप्रमाणे व्यायाम घेऊन ६ महिन्यांत ही स्थिती आणावी व दरमहा डॉक्टरी तपासणी करावी. या प्रकारे या हृदयरोगावर प्रभुत्व मिळविता येते व हृदय बळकट बनविता येते.
योगाभ्यासाचे फायदे
योगाभ्यास शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. नियमित योगासने केल्याने:
- शारीरिक व्याधी दूर होतात.
- मानसिक ताण कमी होतो.
- शरीराची लवचिकता वाढते.
- पचनक्रिया सुधारते.
- एकूण जीवनशैलीत सुधारणा होते.
योगासनांचा नियमित सराव करून तुम्ही निरोगी जीवनशैली अंगीकारू शकता. डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य आसने निवडून त्याचा नियमित सराव करणे महत्त्वाचे आहे. योगाच्या मदतीने शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती प्राप्त करून आनंदी जीवन जगा!
हेही वाचा - आरोग्यदायी योगासनांचे अनोखे फायदे
सारांश
हल्लीच्या समाजरचनेत स्वतंत्रतेचे इतके वातावरण निर्माण झाले आहे, की कोणाही व्यक्तीवर कशाचेही बंधन राहिलेले नाही.
खाण्यापिण्यावर बंधन राहिलेले नाही, झोपेवर बंधन राहिलेले नाही, आचारविचारांवरही बंधन राहिलेले नाही. त्यामुळे वागण्याचा तोल सुटलेला आहे व मनाला शांतता नसल्याने मनुष्य रोगांच्या आहारी जात चालला आहे. आजच्या महागाईच्या काळात परिस्थितीला तोंड देण्यासाठी अनेक उठाठेवी व धावपळी कराव्या लागतात.
हल्ली बहुतेक आजार शारीरिक व मानसिक स्वरूपाचे असतात. त्यामुळे मनावर निर्माण होणाऱ्या ताणाचे गांभीर्य लक्षात येते. मनःशांती लाभणे कठीण झाले आहे. मानसिक समाधान प्राप्त होण्यासाठी अलीकडे योगाभ्यासाकडे लोकांचा कल झुकत चालला आहे. योगोपचाराचा उपयोग शारीरिक व मानसिक विकार दूर करण्याकडे होत आहे. डॉक्टरी उपायाच्या बरोबरीने हे योगोपचार केल्याने अधिक गुण येतो हे आता सिद्ध झालेलं आहे.
0 Comments