Header Ads Widget

PAT - 1 chatbot | पॅट -१ च्या गुण नोंदणीसाठी चाटबॉट उपलब्ध

PAT -1 chatbot

महाराष्ट्रात पायाभूत मूल्यमापन चाचणी (PAT-1) गुण नोंदणीसाठी चाटबॉट उपलब्ध

काय आहे PAT -1 ?

 STARS प्रकल्पामधील SIG-२ limproved Learning Assessment System नुसार सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन १ व संकलित मूल्यमापन २(PAT-१ ते ३) चे आयोजन करण्यात येणार आहे. 

PAT -1 चे आयोजन कधी करण्यात आले?

 राज्यात पायाभूत मूल्यमापन चाचणी PAT-१ चे आयोजन दि. १० ते १२ जुलै २०२४ या कालावधीत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी अनुदानित शाळामध्ये करण्यात आलेले होते. 

PAT -1 मध्ये कोणत्या विषयांचा समावेश करण्यात आला ?

प्रथम भाषा (सर्व माध्यम), गणित (सर्व माध्यम), तृतीय भाषा इंग्रजी या विषयांचे पायाभूत मूल्यमापन चाचणी PAT-१ घेण्यात आलेली आहे. 

PAT -1 मध्ये शिक्षकांची भूमिका काय?

सदर पायाभूत मूल्यमापन चाचणी PAT-१ शिक्षकांनी तपासणे,

 तसेच सदर मूल्यमापनाचे गुण विद्या समीक्षा केंद्र (VSK) यांचेमार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पोर्टलवर भरने 

चॅटबॉट (chatbot) काय आहे?

विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा चाटबॉट पायाभूत मूल्यमापन चाचणी PAT-१ गुण भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यावर पायाभूत मूल्यमापन चाचणी PAT-१ शिक्षकांनी नोंदविणे आवश्यक आहे. 


चॅटबॉट (chatbot) वर गुण नोंदविण्याचा कालावधी किती आहे?

राज्यातील शिक्षकांना पायाभूत चाचणी (PAT-१) चे गुण दि. २७ जुलै २०२४ ते दि. २० ऑगस्ट २०२४ पर्यंतचा PAT (महाराष्ट्र) या चाटबॉटवर नोंदविणेकरिता कालावधी देण्यात येत आहे.

चॅटबॉट (chatbot) गुण नोंदणी वर सनियंत्रण कोणाचे असेल?

उपरोक्त कामकाजासाठी जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथ. / माध्य., शिक्षण निरीक्षक व प्रशासन अधिकारी, म.न.पा./न.पा. यांनी आपल्या कार्यालयातील एका अधिकाऱ्याकडे PAT (महाराष्ट्र) जिल्हा समन्वयक म्हणून जबाबदारी  निश्चित केली आहे. 

 ज्या शाळांमध्ये पायाभूत मूल्यमापन चाचणी PAT-१ घेण्यात आलेली आहे. अशा इयत्ता तिसरी ते नववीच्या शाळामधील विषयनिहाय विद्यार्थ्यांचे गुण चाटबॉटवर नोंदविण्यात  याव्यात. 


चाटबॉटच्या बाबतीत तांत्रिक अडचण येणाऱ्या शिक्षकांनी सोबत दिलेल्या गुगल लिंकवर प्रतिसाद नोंदवावा.


सदर चाटबॉटवर पायाभूत मूल्यमापन चाचणी PAT-१ चे गुण शिक्षकांनी कसे नोंदवावेत याच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना सोबत देण्यात येत आहे. 

पायाभूत मूल्यमापन चाचणी (PAT-१) चाटबॉट (chatbot) चा वापर करण्याविषयी मार्गदर्शिका खाली दिली आहे.

याबाबतच्या व्हिडीओची यु-ट्यूब लिंक प्रस्तुत कार्यालयाच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर देण्यात येणार आहे. 


पायाभूत मूल्यमापन चाचणी (PAT-१) गुणांची नोंद करणेसाठी - येथे क्लिक करा

 

Post a Comment

0 Comments