माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांना कलागुण दाखविण्यासाठी कला उत्सव २०२४-२५ : एक सुवर्णसंधी
कला उत्सव हा विद्यार्थ्यांमधील कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी आयोजित केला जाणारा एक मोठा कार्यक्रम आहे. २०१५-१६ पासून सुरू झालेला हा उपक्रम, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, नवी दिल्ली यांच्यामार्फत राष्ट्रीय स्तरावर आयोजित केला जातो. या उत्सवात भारतातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश उत्स्फूर्तपणे भाग घेतात.
उद्देश्य :
कला उत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला वाव देऊन, त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणे.
कला उत्सव २०२४-२५ मध्ये समाविष्ट कला प्रकार :
विद्यार्थी खालील ६ कला प्रकारांपैकी कोणत्याही एका प्रकारात सहभागी होऊ शकतात:
1. गायन - शास्त्रीय/लोकसंगीत, भक्तीगीत (एकल/समूह).
2. वादन - शास्त्रीय स्वर वाद्य, तालवाद्य (एकल/समूह).
3. नृत्य - शास्त्रीय, प्रादेशिक लोकनृत्य, समकालीन नृत्यरचना (समूह).
4. नाट्य - एकपात्री अभिनय, मूकाभिनय, नाटक (समूह).
5. दृश्यकला - द्विमित, त्रिमित चित्र, शिल्पकला, स्वदेशी खेळणी.
6. कथावाचन - पारंपारिक गोष्ट किंवा कथावाचन (एक/दोन विद्यार्थी).
आयोजन प्रक्रिया:
- विद्यार्थ्यांची निवड :
६ कला प्रकारांतून प्रत्येक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची निवड स्पर्धांच्या माध्यमातून होईल. १५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवडलेले विद्यार्थी घोषित होतील.
- स्पर्धेचे स्वरूप:
प्रत्येक जिल्ह्यात ६ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०२४ दरम्यान जिल्हास्तरावरील स्पर्धा होणार आहेत.
- राज्यस्तरीय स्पर्धा:
पुणे येथे ऑक्टोबर २०२४ मध्ये होईल. त्यातून निवडलेले २३ विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर सहभागी होतील.
महत्त्वाच्या सूचना:
1. प्रत्येक विद्यार्थी फक्त एका कला प्रकारात भाग घेऊ शकेल.
2. स्पर्धेसाठी तयारी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखालीच केली जावी; व्यावसायिक मदत घेता येणार नाही.
3. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना पुन्हा सहभाग घेता येणार नाही.
4. स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांचे सादरीकरण ४ ते ६ मिनिटांचे असावे.
5. जास्तीत जास्त दिव्यांग विद्यार्थ्यांचा सहभाग सुनिश्चित करावा.
6. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवास व भोजन खर्च शासनकडून केला जाईल.
हे ही वाचा - राष्ट्रीय इको क्रिएटिव्हीटी आणि इनोव्हेशन हॅकाथॉन : शाळेतील विद्यार्थ्यांसाठी संधी
कला उत्सव: मार्गदर्शक सूचना -२०२४-२५
कलाप्रकारांचे वर्णन
१.संगीत ( गायन )
खालील प्रकारात स्पर्धा आयोजित केल्या जातील. यापैकी कोणत्याही एका कलाप्रकारात किंवा उपप्रकारात विद्यार्थी सहभागी होऊ शकतील.
१.गायन एकल- शास्त्रीय गायन, भक्तीगीत, पारंपारिक लोकगीत/ आदिवासी गीत
२.गायन समूह -समूहगीत, लोकगीत/आदिवासी गीत, भक्तीगीत, देशभक्ती गीत
सामान्य सूचना :
१. सादरीकरण कालावधी चार ते सहा मिनिटाचा राहील.
२. वेशभूषा, रंगमंच सजावट या सादरीकरणाशी सुसंगत असाव्यात.
३. साथ - संगतीसाठी शाळेतील विद्यार्थी अथवा शिक्षकांची मदत घेता येईल.
४. व्यावसायिक संगीत अथवा चित्रपटातील गीतांचे ट्रॅक ( Music track ) वापरता येणार नाहीत .
२.वादन
खालील प्रकारात स्पर्धा आयोजित केल्या जातील. यापैकी कोणत्याही एका कलाप्रकारात किंवा उपप्रकारात विद्यार्थी सहभागी होऊ शकतील.
१.वादन एकल: तालवाद्य शास्त्रीय वादन
२.वादन एकल: स्वरवाद्य शास्त्रीय वादन
३. वाद्यवृंद (ऑर्केस्ट्रा)- लोकगीत किंवा शास्त्रीय धून
सामान्य सूचना :
१. तालवाद्य वादन यामध्ये भारतीय तालवाद्ये जसे की मृदुंग, तबला, ढोल, नाल इत्यादी वाद्यांचा
समावेश आहे.
२. स्वरवाद्य वादन यामध्ये भारतीय स्वर वाद्ये जसे की व्हायोलीन, सतार, बासरी, हार्मोनियम,
सरोद, विणा, सनई, संतूर इत्यादी वाद्यांचा समावेश आहे.
३ सादरीकरणाचा कालावधी चार ते सहा मिनिटाचा राहील.
४. वेशभूषा, रंगमंच सजावट या सादरीकरणाशी सुसंगत असाव्यात.
५. साथ संगतीसाठी शाळेतील विद्यार्थी अथवा शिक्षकांची मदत घेता येईल.
६. इलेक्ट्रॉनिक वाद्य वापरता येणार नाहीत.
३.नृत्य
खालील प्रकारात स्पर्धा आयोजित केल्या जातील. यापैकी कोणत्याही एका कलाप्रकारात किंवा उपप्रकारात विद्यार्थी सहभागी होऊ शकतील.
१.शास्त्रीय नृत्य एकल
२.पारंपारिक लोकनृत्य, स्थानिक लोकनृत्य, गैरफिल्मी समकालीन नृत्यरचना (समूह)
सामान्य सूचना:
१. शास्त्रीय नृत्यामध्ये भरतनाट्यम, छऊ, कथक, सत्तरीय,कुचीपुडी, मोहिनिअत्तम, कथकली, व मणिपुरी या नृत्य प्रकारांचा समावेश आहे.
२. पारंपारिक लोकनृत्यामध्ये कोणत्याही प्रकारचे व कोणत्याही राज्याचे पारंपारिक नृत्य करता येईल.
३. समूहनृत्य पारंपारिक लोकनृत्य असू शकते.
४. समकालीन नृत्यरचना ही गैरफिल्मी असली पाहिजे.
५. सादरीकरणाचा कालावधी चार ते सहा मिनिटांचा राहील.
६. नृत्य हे संगीत साथीसह किंवा ध्वनिमुद्रित संगीतावर सादर करता येईल.
७. वेशभूषा, चेहऱ्याची रंग सजावट ही साधी प्रमाणबद्ध व विषयाशी सुसंगत असावी.
४. नाट्य
खालील प्रकारात स्पर्धा आयोजित केल्या जातील. यापैकी कोणत्याही एका कलाप्रकारात किंवा उपप्रकारात विद्यार्थी सहभागी होऊ शकतील.
१. एकपात्री अभिनय एकल , नकला एकल
२. मूकाभिनय समूह , नाटक समूह
सर्वसाधारण सूचना:
१. यामध्ये आपल्या राज्य किवा जिल्हा, तालुका यातील कोणतेही प्रसिद्ध
व्यक्तिमत्व जसे की समाज सुधारक, कलाकार, लेखक, कवी, वैज्ञानिक, स्वातंत्र्य सेनानी इ. च्या
जीवनातील प्रसंगांचे सादरीकरण विद्यार्थी करू शकतात.
२. सादरीकरणाचा कालावधी सहा ते आठ मिनिटांचा राहील.
३. रंगमंच तयारी आणि नंतर ती आवरणे यासाठी १० (५+५) मिनिटे जास्तीचा वेळ दिला जाईल.
४. सादरीकरण स्वतःच्या कोणत्याही भाषेमध्ये असू शकेल.
५. वेशभूषा,रंगमंच सजावट, आणि लागणारे इतर साहित्य हे स्वतः आणावयाचे आहे.
६. पार्श्व संगीतासाठी आधीच ध्वनिमुद्रित केलेल्या संगीताचा किंवा म्युझिक ट्रॅकचा उपयोग करता येईल.
५.दृश्यकला
खालील प्रकारात स्पर्धा आयोजित केल्या जातील. यापैकी कोणत्याही एका कलाप्रकारात किंवा उपप्रकारात विद्यार्थी सहभागी होऊ शकतील. यातील सहभाग हा वैयक्तिक असणार आहे. समूह नाही.
१.द्विमितीय कला- चित्र, (Drawing ), पेंटिंग प्रिंटींग, कार्टून, व्यंगचित्र
२.त्रिमितीय- चित्र,मूर्तीकला, मोबाईल
३.स्थानिक खेळणी तयार करणे.
४. स्थानिक शिल्प
सर्वसाधारण सूचना:
१. द्विमितीय कला- चित्र यामध्ये द्विमितीय चित्र, त्रिमितीय चित्र,भिंतीवरील चित्र, फरशीवर काढलेले चित्र यांचा समावेश आहे.
२. त्रिमितीय- यामध्ये चित्र आणि कोणत्याही पर्यावरणपूरक सामग्रीपासून बनविलेले शिल्प याचा समावेश आहे.
३. राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये स्पर्धकांना आपली कलाकृती तयार करण्यासाठी एक दिवसाचा कालावधी दिला जाईल. सहभागी विद्यार्थी कोणत्याही माध्यमाचा व साहित्य सामग्रीचा उपयोग कलाकृती तयार करताना करू शकतो.
४. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी कला सामग्री विद्यार्थ्यांनी स्वतः आणावयाची आहे.
५. .राष्ट्रीय स्पर्धेसाठी सहभागी स्पर्धकांना निश्चित केलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष कलाकृती तयार करावी लागेल.
६. राष्ट्रीय स्तर स्पर्धेसाठी दृश्यकला स्पर्धेतील सहभागींना आपली कलाकृती तयार करण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी दिला जाईल. सहभागी विद्यार्थी कोणत्याही माध्यमाचा व साहित्य सामग्रीचा उपयोग कलाकृती तयार करताना करू शकतो. द्विमितीय कलाकृतीचा आकार २x3 फूट असावा. आणि त्रिमितीय कलाकृतीचा आकार २x२x२ फूट पेक्षा जास्त असू नये. स्थानिक खेळांची संख्या जास्तीत जास्त ४ असावी.
७. राष्ट्रीय स्तर स्पर्धेसाठी स्पर्धकांनी शक्यतो स्वतः चे कला साहित्य न्यायचे आहे. परतू आधी सूचना दिल्यास माती, वाळू, विटा, पीओपी, बोर्ड हे साहित्य आयोजकांकडून मिळू शकेल.
८.राष्ट्रीय स्तर स्पर्धेसाठी सहभागींना प्रत्यक्ष संवादासाठी संयोजकांनी निश्चित केलेल्या ठिकाणी परीक्षकासोबत चर्चेसाठी उपस्थित राहणे अनिवार्य राहील. परिक्षण समिती सहभागीचे तीनही दिवसाच्या कामाचे निरीक्षण करून त्यांच्या सोबत चर्चा करतील.
९. दिलेल्या कालावधीत कलाकृती पूर्ण होईल एवढ्या आकाराची कलाकृती असावी.
१०.स्थानिक खेळणी तयार करणाऱ्या सहभागींनी खेळणी तयार करताना खेळण्याचे मूळ रूप व त्याची कार्यात्मक अचूकता यावर लक्ष द्यावे.
११.खेळणी कृषी अवजारे व हत्यारे तसेच पंचतंत्र कथा जातक कथा व लोककथांमध्ये नमूद नैतिक मुल्ये वाढविण्यासाठी उपयुक्त असावी.
१२. मूळ खेळणी तयार करण्यासाठी वापरलेल्या साहित्यांचा खेळणी तयार करताना वापर करता येईल. सदरील साहित्य उपलब्ध नसेल किंवा त्यावर बंदी असेल तर सहभागी विद्यार्थी पर्यावरण पूरक साहित्याचा वापर करू शकतात.
१३. राष्ट्रीय स्तरावर दृष्यकलेतील प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला कलाकृती तयार करण्यासाठी ६x४ फूट इतकी जागा उपलब्ध करून दिली जाईल.
६. पारंपारिक गोष्ट वाचन/ कथावाचन
सहभागी विद्यार्थी गोष्ट वाचन/ कथावाचन यामध्ये कोणत्याही एक किंवा अधिक कला प्रकारांचा (उदा. नृत्य, संगीत, दृश्यकला, नाटक) उपयोग करू शकतात.
सर्वसाधारण सूचना:
१. १ किंवा २ विद्यार्थी कथावाचन करतील.
२. वेशभूषा, रंगभूषा, मंच सजावट आणि संगीत हे सहभागी विद्यार्थ्यांच्या पसंतीचे असेल.
३. कथा वाचन ५ मिनिटांपेक्षा अधिक असू नये.
४. सादरीकरण कोणत्याही भाषेमध्ये असू शकेल.
अशाप्रकारे खवा उत्सवाच्या आयोजन केले जाणार आहे. तरी जास्तीत जास्त संख्येने माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा विद्यालयातील विद्यार्थ्यांनी या उत्सवात सहभागी व्हावे.
0 Comments