राष्ट्रीय इको हॅकाथॉन: शाळेतील विद्यार्थ्यांसाठी संधी
भारत सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयांतर्गत पर्यावरण शिक्षण कार्यक्रम (EEP) आणि पायजाम फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 'राष्ट्रीय इको क्रिएटिव्हिटी आणि इनोव्हेशन हॅकाथॉन' चे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा उद्देश पर्यावरणपूरक आणि शाश्वत जीवनशैलीसाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे हा आहे. इयत्ता ६वी ते १२वी पर्यंतचे विद्यार्थी या हॅकाथॉनमध्ये सहभागी होऊ शकतात.
हॅकाथॉनची उद्दिष्टे:
विद्यार्थी, शिक्षक, आणि पर्यावरणप्रेमींना एकत्र आणून पर्यावरण समस्यांवर नाविन्यपूर्ण उपाय शोधणे, शाश्वत विकास उद्दिष्टांना (SDGs) समर्थन देणे, आणि समाजात पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करणे हे या हॅकाथॉनचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
हॅकाथॉनचे स्वरूप:
विद्यार्थी खालील सात पर्यावरणविषयक थीममधून एक निवडू शकतात:
1. आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारणे
2. शाश्वत अन्नप्रणाली स्वीकारणे
3. ई-कचरा कमी करणे
4. कचरा कमी करणे
5. उर्जा बचत
6. पाणी वाचवा
7. प्लास्टिकच्या एकेरी वापराला नाही म्हणणे
विद्यार्थ्यांनी निवडलेल्या थीमवर आधारित समस्या सोडविण्यासाठी उपाय मांडणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना कोडिंग शिकण्यासाठी व्हिडिओ उपलब्ध करून दिला जाईल आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या कल्पनांना लेखन, चित्र, व्हिडिओ किंवा ऑडिओ स्वरूपात सादर करावे लागेल.
सहभागी होण्याचे टप्पे:
1. नोंदणी : दि. ५ जून ते २३ सप्टेंबर २०२४ पर्यंत विद्यार्थ्यांना https://codemitra.org/eco-life या लिंकवर नोंदणी करावी लागेल.
2. तज्ञांकडून मूल्यांकन : सप्टेंबर ते ऑक्टोबर २०२४ दरम्यान विद्यार्थ्यांच्या कल्पनांचे मूल्यांकन करण्यात येईल.
3. निवड : ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात सर्वोत्कृष्ट १०५ विद्यार्थ्यांची निवड होईल.
4. मार्गदर्शन : नोव्हेंबर २०२४ मध्ये निवडलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे प्रोटोटाईप तयार करण्यासाठी ऑनलाईन मार्गदर्शन मिळेल.
5. राष्ट्रीय स्तरावर कार्यक्रम : डिसेंबर २०२४ मध्ये दिल्ली येथे २ दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल, जिथे निवडलेल्या विद्यार्थ्यांना त्यांची सर्जनशीलता सादर करण्याची संधी मिळेल.
संपर्क:
या हॅकाथॉनबद्दल अधिक माहितीसाठी किंवा कोणत्याही शंकांसाठी खालील संपर्क क्रमांकावर विचारू शकता:
- श्रीमती प्रांजली पाठक: ९८२०८०३६७७
- श्रीमती हर्षदा भांबरे: ७७०९०६०७६१
स्पर्धेची प्रक्रिया:
नोंदणी आणि कल्पना सादरीकरण: ५ जून २०२४ ते ३० सप्टेंबर २०२४
तज्ञांकडून मूल्यांकन: सप्टेंबर ते ऑक्टोबर २०२४
सर्वोत्कृष्ट १०५ कल्पनांची निवड: ऑक्टोबर २०२४ अखेर
ऑनलाईन मार्गदर्शन: नोव्हेंबर २०२४
राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रम (दिल्ली): डिसेंबर २०२४
राष्ट्रीय स्तरावर सहभागाचे संधी
सर्व विद्यार्थी मोफत सहभाग घेऊ शकतात. या स्पर्धेत उत्कृष्ट १०५ विद्यार्थ्यांना दिल्ली येथे त्यांच्या सर्जनशीलतेची प्रदर्शनी करण्याची संधी मिळेल.
हे ही वाचा -
कंत्राटी शिक्षक भरती - सेवानिवृत्त व बेरोजगार शिक्षकांना मोठी संधी
शाळा व शिक्षक यांची जबाबदारी
हा उपक्रम विनामूल्य असून सर्व शाळांनी याची माहिती आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावी, जेणेकरून ते या राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमात सहभाग घेऊ शकतील.
विद्यार्थ्यांना आवाहन
सहभाग घेण्यासाठी तयार रहा आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी आपल्या नाविन्यपूर्ण कल्पना सादर करा !
शाश्वत विकासासाठी आपला वाटा उचला आणि या हॅकाथॉनमध्ये सहभागी व्हा !
0 Comments