Header Ads Widget

प्लास्टिक बाटलीतील पाणी पिताय..सावधान | health hazards of drinking water in plastic bottle

health hazards of drinking water in plastic bottle


प्लास्टिक बाटलीतील पाणी पिण्याचे आरोग्यावरील दुष्परिणाम

आपण बऱ्याच वेळेस ऑफिसला किवा व्यायामाला जाताना प्लास्टिकच्या बाटलीतून (plastic bottle)पाणी घेऊन जातो. बऱ्याच ठिकाणी पाणी पिण्यासाठी प्लास्टिकचे ग्लास (plastic glass) वापरले जातात. खरंतर, तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार प्लास्टिक एक पॉलीमर आहे. 

प्लास्टिक कार्बन, हायड्रोजन ऑक्सिजन आणि क्लोराइड हे सर्व मिळून बनते. त्याशिवाय प्लास्टिकमध्ये बीपी नावाचे एक केमिकल आढळते, जे आपल्या शरीरासाठी अतिशय (bad for health) घातक असते.

 डॉक्टरांच्या सांगण्यनुसार, जर केमिकल आणि पॉलीमर मध्ये आडळणारी तत्वं आपल्या शरीरात गेली तर आपल्याला अनेक आजार होऊ शकतात.

Plastic bottle ने पाणि पिताना मायक्रोप्लास्टिक्स देखील शरीरात पोहोचतात. मायक्रोप्लास्टिक्स हे प्लॅस्टिकचे छोटे तुकडे असतात, जे 5 मिलिमीटरपेक्षा लहान असतात. प्लास्टिक असल्याने हे तुकडे शरीरात सहज पचत नाहीत आणि शरीरात जमा होऊ लागतात. त्याचा परिणाम शरीरावर दीर्घकाळानंतर दिसून येत असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.


संशोधनात आढळून आली धक्कादायक माहिती 

नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार, “सामान्य प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटलीत प्रतिलिटर १०५ सूक्ष्म-नॅनो प्लास्टिकचे कण असतात. ही संख्या मायक्रोप्लास्टिक्सवर लक्ष केंद्रित करणाऱ्या पूर्वी नोंदविलेल्या परिणामांपेक्षा दुप्पट-तिप्पट जास्त आहे.” याचा अर्थ असा की, प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये साठवलेल्या प्रत्येक लिटर पाण्यात संशोधकांना १,००,००० पेक्षा जास्त नॅनो प्लास्टिक रेणू सापडले आहेत, असे ‘मेडस्केप’ने एका लेखात नमूद केले आहे. त्यात असे म्हटले आहे, “त्यांच्या लहान आकारामुळे हे कण रक्तप्रवाह, पेशी आणि मेंदूमध्ये प्रवेश करू शकतात, त्यामुळे आरोग्यासाठी संभाव्य धोके निर्माण करू शकतात.” प्रोसिडिंग्स ऑफ द नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसमध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या अभ्यासात वर्णन केलेल्या चिंताजनक निकालांमुळे वैद्यकीय क्षेत्रात यासंबंधीची चर्चा सुरू आहे.


प्लास्टिक बाटलीतील पाणी पिण्याचे आरोग्यावरील दुष्परिणाम जाणून घ्या..

 1. बीपीए आणि इतर रसायनांचे परिणाम

प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये बीपीए (Bisphenol A) आणि इतर रसायने असतात, जी पाण्याशी संपर्कात येतात. उच्च तापमानात किंवा दीर्घकाळ पाणी साठवून ठेवले असता, हे रसायन पाण्यात मिसळू शकते. बीपीएचे सेवन हार्मोन्समध्ये असंतुलन निर्माण करू शकते आणि दीर्घकाळासाठी याचा परिणाम कॅन्सर, मधुमेह आणि हृदयविकारांपर्यंत होऊ शकतो.

बायफेनिल ए सारखे रसायन, जे इस्ट्रोजेनची नक्कल करणारे रसायन आहे, त्यामुळे मधुमेह, लठ्ठपणा, प्रजनन समस्या, वर्तणूक समस्या आणि मुलींमध्ये लवकर यौवन यासारख्या आरोग्य समस्या उद्भवू शकतात. प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी साठवून न पिणे चांगले.


 2. सजीवाणूंचा प्रसार

प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये बॅक्टेरिया आणि इतर सजीवाणू वाढण्याची शक्यता अधिक असते, विशेषतः वापरलेली बाटली वारंवार न धुतल्यास. अशा परिस्थितीत, पाणी पिताना आपण अशा जीवाणूंचा सेवन करू शकतो, ज्यामुळे विविध पोटाचे विकार होऊ शकतात.


 3. पर्यावरणीय परिणाम

प्लास्टिकच्या बाटल्या नष्ट होण्यासाठी हजारो वर्षे लागतात. त्यामुळे, या बाटल्यांचा वापर कमी करून आपण पर्यावरणाचे रक्षण करू शकतो. प्लास्टिक बाटल्यांचा वापर टाळल्याने प्लास्टिकचा कचरा कमी होईल, ज्याचा पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होईल.


 4. पाण्याची गुणवत्ता कमी होणे

प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये पाणी दीर्घकाळ ठेवले तर त्याची गुणवत्ता कमी होऊ शकते. बाटलीतल्या पाण्याचा चव आणि गंध बदलतो, जो आरोग्यासाठी घातक ठरू शकतो.


5. हाडांवरील परिणाम

बीपीएचे सेवन शरीरातील कॅल्शियमच्या शोषणावर परिणाम करू शकते. त्यामुळे, हाडे कमजोर होण्याचा धोका वाढतो, ज्यामुळे ऑस्टियोपोरोसिस सारख्या समस्या उद्भवू शकतात.


6. रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होतो

प्लॅस्टिकच्या बाटल्यांमधून पाणी साठवून ठेवू नये किंवा पिऊ नये अशी शिफारस केली जाते . याचे कारण असे की प्लॅस्टिकमधील रसायने आपल्या शरीरात प्रवेश करतात आणि आपल्या रोगप्रतिकारक शक्तीला त्रास देण्यास सक्षम असतात.


7. यकृताचा कर्करोग आणि शुक्राणूंची संख्या कमी

प्लास्टिकमध्ये phthalates नावाचे रसायन असल्यामुळे यकृताचा कर्करोग आणि शुक्राणूंची संख्या कमी होणे (पुरुषांमध्ये) यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. फ्रेडोनिया येथील स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्कने नुकत्याच केलेल्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की बाटलीबंद पाण्यात, विशेषतः लोकप्रिय ब्रँडमध्ये मायक्रोप्लास्टिक्सचे प्रमाण जास्त आहे.


8. डायऑक्सिन उत्पादन

सूर्याच्या थेट संपर्कात आल्याने, प्लास्टिकच्या बाटल्यांमधून रासायनिक लीचिंग होऊ शकते आणि डायऑक्सिनसारखे हानिकारक रसायने बाहेर पडू शकतात ज्यामुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढतो.

थेट सूर्यप्रकाशात डायऑक्सिन नावाचे विष बाहेर पडते, जे सेवन केल्यावर स्तनाचा कर्करोग वाढू शकतो.


9. हायपोथायरॉईडीझम चा त्रास

बीपीए म्हणजेच बिस्फेनॉल ए थायरॉईड हार्मोन रिसेप्टरचे प्रमाण कमी करते. ज्यामुळे हायपोथायरॉईडीझमसारखे गंभीर आजार होऊ शकतात. प्लास्टिक आपल्या शरीराला इतर मार्गांनीही हानी पोहोचवू शकते. एका संशोधनानुसार, प्लास्टिकच्या बाटलीमध्ये EDC सारखे अत्यंत घातक आणि हानिकारक रसायन म्हणजेच एंडोक्राइन डिसप्टिंग केमिकल आढळते. जे मानवी हार्मोनल सिस्टमला हळूहळू परंतु थेट नुकसान करते.


10. अंडाशय संबंधित रोग

प्लॅस्टिकमध्ये असलेल्या रसायनांमुळे महिलांमध्ये अंडाशयाशी संबंधित आजार, स्तनाचा कर्करोग, कोलन कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर यासारख्या समस्याही उद्भवतात. 


11. इतर काही गंभीर आजार 

बाटल्यांच्या उत्पादनात वापरले जाणारे प्लास्टिसायझर्स, स्टेबिलायझर्स आणि रंगद्रव्ये यांसारखी संयुगे मायक्रोप्लास्टिक्सद्वारे सोडली जातात. हे रक्तप्रवाहाद्वारे आपल्या शरीराच्या विविध भागांमध्ये पोहोचू शकतात. ही रसायने जळजळ, जीनोटॉक्सिसिटी, ऑक्सिडेटिव्ह तणाव आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टचे नुकसान यासारख्या आरोग्य समस्यांशी जोडलेले आहेत.


Plastic bottle ऐवजी तांब्यांच्या भांड्याचा करा वापर

प्लॅस्टिक पेक्षा तांब्याचे भांडे वापरणे उत्तम ठरेल. पूर्वीच्या काळात अनेक लोक तांब्याच्या भांड्यात ठेवलेल्या पाण्याचा वापर करत असत. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, तांबे हे शरीरासाठी अतिशय पोषक असते. त्यामुळे लोकांनी तांब्याच्या भांड्यात ठेवलेलेच पाणी प्यावे.


हेही वाचा - ताक पिण्याचे कोणते फायदे आहेत जाणून घ्या 


सारांश

प्लास्टिकच्या बाटल्यांमधून पाणी पिण्याने अनेक घातक रासायनिक घटक आपल्या शरीरात सहज प्रवेश करू शकतात. परिणामी, इन्सुलिन प्रतिकार, वजन वाढणे, प्रजनन क्रियेची पातळी खालावणे आणि कर्करोगासारखे भयंकर आजार होण्याची शक्यता असते.

प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिणे सोयीस्कर वाटत असले तरी, त्याचे दीर्घकालीन परिणाम आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे, शक्य तितक्या स्टील किंवा काचेच्या बाटल्यांचा वापर करावा. यामुळे आपण आपल्या आरोग्याची आणि पर्यावरणाची काळजी घेऊ शकतो.


Post a Comment

0 Comments