निपुण भारत अभियान अंतर्गत सुधारित लक्ष्ये आणि त्यांच्या अंमलबजावणीसाठी नवीन मार्गदर्शक सूचना
या लेखातून आपणास कोणती माहिती मिळेल?
1. निपुण भारत अभियान 2023: सुधारित लक्ष आणि NCF-FS नुसार नवीन संरचना कोणती?
2. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत निपुण भारत अभियानाचे सुधारित लक्ष्य कोणते?
3. NIPUN भारत अभियानाचे अद्ययावत लक्ष्य आणि कार्यान्वयन धोरणे कोणती?
4. NIPUN भारत अभियान: पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञानात सुधारित लक्ष्य कोणती आहेत?
5. निपुण भारत अभियानातील नवीन सुधारणा आणि जिल्हास्तरीय अंमलबजावणी कशी होणार आहे?
6. निपुण भारत अभियान – नवीन संरचना व सुधारित लक्ष्ये कोणती आहेत?
7. निपुण भारत अभियान अंतर्गत सुधारित लक्ष्ये कोणती?
पार्श्वभूमी
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार तसेच निपुण भारत अभियान मार्गदर्शक सूचनेनुसार विद्यार्थ्यांचे पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान विकसित होण्यासाठी केंद्र व राज्य स्तरावरून विविध उपक्रमांचे नियोजन व अंमलबजावणी करण्यात येत आहे. सदर अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणी साठी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
National Initiative for Proficiency in Reading with Understanding and Numeracy - NIPUN Bharat
निपुण भारत अभियानाचे उद्दिष्ट
यापूर्वी यानुसार निपुण भारत अभियानाचे उद्दिष्ट बालवाटिका ते इयत्ता तिसरीपर्यंतच्या (३ ते ९ वर्ष वयोगट) सर्व विद्यार्थ्यांनी सन २०२६-२७ अखेर पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त करणे हे होते. सदर वयोगटानुसार इयत्तानिहाय लक्ष्य निर्धारित करण्यात आलेले होते.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधील शिफारस
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार शिक्षणाच्या स्तरांची पुनर्रचना करण्यात आली. या धोरणात सुचविल्यानुसार ५+३+३+४ या नवीन संरचनेचा स्वीकार करण्यात आला आहे. यानुसार, पायाभूत स्तर - बालवाटिका ते इयत्ता दुसरी पर्यंत असून पूर्वतयारी स्तर इयत्ता तिसरी ते पाचवी असा आहे.
उचललेली पावले
यानुसार राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर २०२२, व राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा - शालेय शिक्षण २०२३ ची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच राज्य स्तरावर उपरोक्त संरचनेनुसार राज्य अभ्यासक्रम आराखडा-पायाभूत स्तर व शालेय शिक्षण यांची निर्मिती करण्यात आली आहे.
भारत सरकारच्या सूचना
याकरिता, उपरोक्त सुधारित संरचना व निपुण भारत अभियान याचेशी संबंधित वयोगट यामध्ये एकवाक्यता असण्यासाठी शिक्षा मंत्रालय, भारत सरकार यांनी बदललेल्या संरचनेनुसार निपुण भारत अभियान अंतर्गत समाविष्ट वयोगट व लक्ष्य यामध्ये केलेली सुधारणा सर्व संबंधित घटकांना अवगत करण्याबाबत कळविले आहे.
उपरोक्त सुधारित लक्ष्यबाबत मार्गदर्शक सूचना खालीलप्रमाणे आहेत.
मार्गदर्शक सूचना -
१. प्रचार व प्रसार
अभियानाशी संबंधित सर्व घटक जसे, क्षेत्रीय अधिकारी, शैक्षणिक संस्था, शाळा, शिक्षक, पालक व विद्यार्थी, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, स्थानिक संस्था प्रतिनिधी यांना इयत्तानिहाय सुधारित लक्ष्यबाबत अवगत करणे.
याकरिता सर्व आवश्यक माध्यमांचा वापर करणे जेणेकरून सर्वांपर्यंत सदर योग्य माहिती वेळेत पोहोचेल.
२. निपुण भारत अभियान प्रतिज्ञा
प्रत्येक शाळा व संबंधित संस्था मध्ये निपुण भारत अभियान प्रतिज्ञा पोस्टर / भित्तीपत्रक प्रदर्शित करणे.
३. वयोगटनिहाय लक्ष्य यांचे पोस्टर
प्रत्येक शाळा व संबंधित संस्था मध्ये निपुण भारत अभियान सुधारित इयत्ता / वयोगटनिहाय लक्ष्य यांचे पोस्टर / भित्ती पत्रक प्रदर्शित करणे.
४. वर्गखोल्यांमध्ये अध्ययन निष्पत्ती
निपुण भारत अभियान अंतर्गत प्रत्येक वर्गात निपुण भारत अभियानाची ३ ध्येये व संबंधित अध्ययन निष्पत्ती प्रिंट स्वरुपात (हार्ड कॉपी) उपलब्ध असावेत.
सदर संदर्भीय ध्येये व संबंधित अध्ययन निष्पत्ती राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर २०२३ मध्ये परिशिष्ट मध्ये देण्यात आल्या आहेत. त्यांचे अवलोकन करावे.
सदर आराखडा परिषदेच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
निपुण भारत अभियान - जिल्हास्तरीय अंमलबजावणी आढावा कार्यशाळा
अभियानचे उद्दिष्ट व लक्ष्य सन २०२६-२७ पर्यंत प्राप्त होण्याच्या दृष्टीने आपल्या जिल्ह्यातील निपुण भारत अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करणे, पुढील नियोजन, Best Practices, येणाऱ्या अडचणी याविषयक कार्यशाळेचे आयोजन केले जाणार आहे.
निपुण भारत अभियानाचे लक्ष्य साध्य करण्यासाठी आवश्यक बाबी
१. प्रभावी अंमलबजावणी :
राज्य आणि स्थानिक स्तरावरून निपुण भारत अभियानाचे ध्येय साध्य करण्यासाठी योजनाबद्ध पद्धतीने अंमलबजावणी करावी.
२. कालबद्ध आराखडा तयार करणे :
सर्व जिल्ह्यांनी त्यांच्या क्षेत्रातील योजना तयार करून ती वेळेत पूर्ण करण्यासाठी काळजी घ्यावी.
३. कार्यवाही अहवाल सादर करणे : अभियानाच्या प्रगतीचा आणि अंमलबजावणीच्या स्थितीचा अहवाल तात्काळ सादर करावा.
हेही वाचा - निपुण भारत अभियानाविषयी संपूर्ण माहिती जाणून घ्या
नवीन बातमी - APAAR ID : महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी नवीन ओळख प्रणाली
सारांश
निपुण भारत अभियानाचे ध्येय म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला पायाभूत साक्षरता व संख्याज्ञानात कुशल बनवणे. सुधारित लक्ष्यांनुसार कार्यवाही केल्यास या महत्त्वाकांक्षी अभियानाच्या यशाची संधी अधिक वाढेल.
शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांनी एकत्र येऊन ही नवी दिशा साध्य करण्यासाठी कार्यवाही करावी आणि भारताच्या शैक्षणिक धोरणाला पुढे नेण्यासाठी या अभियानाचा सक्रिय सहभाग नोंदवावा.
0 Comments