स्टार्स प्रकल्पांतर्गत राज्यभरात करिअर मेळाव्याचे आयोजन होणार
पार्श्वभूमी
जागतिक बँक पुरस्कृत STARS प्रकल्पांतर्गत इयत्ता ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी मेळावे आयोजित करण्यासाठी PAB अंतर्गत मान्यता मिळालेली आहे.
करियर मेळाव्याचे महत्त्व
व्यवसाय मार्गदर्शन मेळाव्यातून इयता ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडी-निवडी, क्षमता, व्यक्तिमत्व वैशिष्ट्ये याबाबत जाणीव निर्माण करण्यासंदर्भात समुपदेशकामार्फत समुपदेशन करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःबद्दल ओळख निर्माण होऊन नोकरी व व्यवसायाची निवड करण्यास मदत होईल, ते व्यवसायात अधिक कामगिरी करतील व स्वतःच्या आवडीचे करिअर घडवतील.
करिअर मेळाव्याचे आयोजन कोण करणार?
यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमार्फत डिसेंबर २०२४ महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात दोन दिवसीय करिअर मेळाव्याचे आयोजन करावयाचे आहे.
करियर मेळाव्याचे स्वरूप कसे असणार?
संबंधित मेळाव्यातील पहिल्या दिवशी तज्ञांमार्फत विद्यार्थी व पालकांना करिअर समुपदेशन तसेच दुसऱ्या दिवशी जिल्ह्यातील नियोक्त्यामार्फत व्यवसाय नियुक्ती संदर्भात विद्यार्थ्यांच्या मुलाखतीचे आयोजन व प्रत्यक्ष स्थळी नियुक्ती पत्र देण्याचे नियोजन करावयाचे आहे. संबंधित मेळा यशस्वी करण्यासाठी आधी नियोजन करणे आवश्यक आहे.
करिअर मेळावा आयोजनासाठीच्या मार्गदर्शक सूचना
- जिल्हास्तरावर व्यवसाय मार्गदर्शक मेळावे आयोजित करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक मेळाव्याचे आयोजन करावे. प्रत्येक मेळाव्यात प्रत्येक दिवशी किमान ५०० विद्यार्थी उपस्थित राहतील याकरिता नियोजन व त्या अनुषंगाने व्यवस्था करणे.
- व्यवसाय मार्गदर्शक मेळाव्याकरिता शक्यतो व्यवसाय शिक्षण सुरु असणाऱ्या शाळेची निवड करण्यासाठी प्राधान्य द्यावे. यामुळे पालकांना व्यवसाय प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधता येईल.
- व्यवसाय मार्गदर्शक मेळाव्याच्या ठिकाणी संगणकासह योग्य संगणक प्रयोगशाळा इंटरनेट सुविधेसह योग्य वीज पुरवठ्याची उपलब्धता असावी.
- सदर मेळाव्याकरिता पालकांनाही या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आमंत्रण देण्यात यावे.
- राज्य स्तरावर उपलब्ध समुपदेशकांच्या सहाय्याने व्यवसाय मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात यावे.
- जिल्ह्यात कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत जिल्ह्यातील नोकरी इच्छुक विद्यार्थ्यांना नोकरी उपलब्ध करून देण्यासाठी संबंधिताना आमंत्रित करण्यात यावे.
- सदर मेळाव्यासाठी नोकरी इच्छुक विद्यार्थी विविध क्षेत्रातील नियोक्ता / उद्योजक नोंदणी व उपलब्ध रिक्तपदे अधिसूचित केली जातील व सदर रिक्त्पदासाठी पत्र नोकरी इच्छुक विद्यार्थी व नियोक्त्याना माळव्याच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर आणण्याचे नियोजन करावे,
- या मेळाव्यांतर्गत उद्योजक त्यांच्याकडील रिक्तपदाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेऊन इ १२ उत्तीर्ण होणारे व १८ वर्ष वय पूर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यास नोकरीच्या संधी उपलब्ध करून देऊ शकतात.
- व्यवसाय मार्गदर्शन मेळावा अधिक प्रभावीपणे आयोजित करण्यासाठी विविध उद्योजकांचा सहभाग वाढविण्यासाठी खालील बाबींचे पालन करावे.
- जिल्हास्तरावर उद्योजक संघटना / उद्योजक /सेक्टर स्कील कौन्सिल /प्लेसमेंट एजन्सीज यांच्या समवेत बैठकीचे आयोजन करावे.
- सर्व उद्योजकांची आधीच नोंदणी करून घेण्यासाठी रजिस्ट्रार ऑफ कंपनीज, GST, MAHADISCOM, MPCB, जिल्हा उद्योग केंद्र, MSEB, जिल्हा उपनिबंधक सहकार, उद्योजक संघटना इत्यादी कडून याद्या प्राप्त करून उद्योजकांची आधीच नोंदणी करून घ्यावी.
- सर्व उद्योजकांना त्यांचेकडील रिक्तपदे अधिसूचित करण्याबाबत इ मेल/पत्र / प्रत्यक्ष/दूरध्वनी/भ्रमणध्वनी/ सोशल मिडिया इ. मार्फत संपर्क करावा व रिक्तपदे अधिसूचित होतील अशी सर्व कार्यवाही करावी.
- 10. व्यवसाय मार्गदर्शन मेळाव्यात प्लेसमेंट एजन्सीजचा सहभाग वाढविल्यास सदर प्लेसमेंट एजन्सीजकडे नोंदणीकृत असलेल्या कंपनी / उद्योजक सुद्धा आपल्या सेवांचा लाभ घेऊ शकतील परिणामी उद्योजक नोंदणीत व रिक्तपदे अधिसूचित होण्याच्या संख्येत वाढ होऊन उमेदवारांना रोजगार उपलब्ध होणे सुलभ होईल.
- 11. व्यवसाय मार्गदर्शन मेळाव्यात मा. आयुक्त / मा. मुख्य कार्यकारी अधिकारी / यशस्वी उद्योजक यांना सहभागी होण्यासाठी विनंती करावी व शक्य तेथे मार्गदर्शनाचा लाभ विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावा.
- 12. व्यवसाय मार्गदर्शक मेळाव्यापूर्वी MSME रोजगार देणारे उद्योजक यांच्या मदतीने जिल्ह्यातील इच्छुक उद्योजक यांना मेळाव्यात सहभागी होण्यासाठी प्रसिद्धी द्यावी.
करिअर मेळावा अधिक प्रभावी होण्यासाठी खालील बाबींचे पालन करणे गरजेचे आहे.
प्रचार व प्रसिद्धी -
मेळाव्यापूर्वी मेळाव्याचा प्रचार व प्रसिद्धी करणे अत्यंत आवश्यक आहे.
जास्तीत जास्त नियोक्ते उद्योजक प्लेसमेंट एजन्सीज नोंदणी करून त्यांचेकडील रिक्तपदे अधिसूचित करतील.
सदर रिक्तपदांना जास्तीत जास्त उमेदवार अर्ज/नोंदणी करतील अशी कार्यवाही करण्यासाठी तसेच नोंदणी व रिक्तपदासाठी अर्ज करण्यासाठी अर्ज करण्याची कार्यपद्धतीबाबत प्रसिद्धी करण्यासाठी विविध मीडियाद्वारे प्रचार व प्रसिद्धी/आवाहन करण्यात यावे.
उदा.
• सोशल मिडिया
• दृक्श्राव्य
• फ्लेक्झीबोर्ड
• रिक्षा /बसवरील बॅनर
• पॉम्प्लेट/लिफलेट
• लाउडस्पीकर द्वारे प्रचार
• वर्तमान पत्रातील प्रेसनोट
• जिल्हा माहिती अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यामार्फत प्रती देण्यात याव्यात
• उद्योग संघटना समवेत बैठकी
• नियोक्ते/उद्योजक /प्लेसमेंट एजन्सीज व विद्यार्थी यांना प्रत्यक्ष इ-मेलद्वारे संपर्क करावा
नोंदणी अभियान
• उमेदवार-सर्व महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, प्रशिक्षण संस्था (TP-TC /VTP). प्लेसमेंट एजन्सीज, लोकप्रतिनिधी /सामाजिकसंस्था, स्थानिक लोक प्रतिनिधी इ. चा सहभाग घेणे.
• नोंदणीकृत विद्यार्थ्यांना मेळाव्यात सहभागी होण्याबाबत एस एम एस / ई-मेल पाठवणे यासाठी प्रशिक्षण संस्था, (TP-TC/VTP), सामाजिक संस्था, इ चा सहभाग घेणे.
• Stalls उभारणे
मेळाव्यामध्ये स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांकरीता माहिती मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी राज्य / केंद्र शासनाचे विविध महामंडळे, राष्ट्रीयकृत बँक, खाजगी बँक/वित्तीय संस्था, स्वयंरोजगार योजना राबविणारे कार्यालय / यंत्रणा/विभाग, सेक्टर स्कील कौन्सिल इ यांना निमंत्रित करणे.
त्यासाठी आवश्यकतेनुसार Stalls उभारावे अथवा बसण्याची आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे.
अप्रेंटीसशिप मेळावे
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय, व्यवसाय शिक्षण/प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी व महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी यांचेमार्फत राबविण्यात येणारे अप्रेंटीसशिप मेळावे सुध्दा या व्यवसाय मार्गदर्शन मेळाव्यात एकत्रितपणे आयोजित करण्यात यावे. त्यासाठी जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी/संबंधित अधिकारी यांच्याशी संपर्क करावा.
• समुपदेशन सत्र-
सदर मेळाव्यात पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता अशा विविध विषयांवर समुपदेशन करण्यात यावे. यासाठी तज्ञ समुपदेशक यांना निमंत्रित करण्यात यावे,
सारांश
या मेळाव्यामुळे विद्यार्थ्यांना नोकरीच्या आणि स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. नियोक्त्यांसाठीही हा एक सुवर्णसंधी आहे, जिथे ते स्थानिक प्रतिभावंतांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या आवश्यकतेनुसार योग्य उमेदवार निवडू शकतात. विद्यार्थ्यांना त्यांची आवड आणि क्षमता लक्षात घेऊन करिअर निवडण्याची आणि स्वतःच्या भविष्यासाठी योग्य निर्णय घेण्याची संधी मिळेल.
जागतिक बँकेच्या STARS प्रकल्पांतर्गत होणारे हे व्यवसाय मार्गदर्शन मेळावे विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरतील. हा उपक्रम विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन देऊन त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल असेल.
0 Comments