Header Ads Widget

PAT - 2 चे गुण chatbot मध्ये नोंदविण्याची प्रकिया सुरू


PAT - 2 chatbot


संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT-२) (महाराष्ट्र) या चॅटबॉटवर गुण नोंदविण्याची प्रकिया सुरू 

पार्श्वभूमी 

 STARS प्रकल्पामधील SIG-२ Improved Learning Assessment System नुसार सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन १ व संकलित मूल्यमापन २ (PAT-१ ते ३) चे आयोजन करण्यात येत आहे. 


आयोजन कधी करण्यात आले 

 राज्यात संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT-२), चे आयोजन दि. २२ ते २५ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी अनुदानित शाळामध्ये करण्यात आलेले होते.

 

कोणते विषय समाविष्ट होते

प्रथम भाषा (सर्व माध्यम), गणित (सर्व माध्यम), तृतीय भाषा इंग्रजी या विषयांचे संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT-२) घेण्यात आलेली आहे. सदर संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT-२) शिक्षकांनी तपासणेबाबत सूचित करण्यात आलेले होते. 


विद्या समीक्षा केंद्र (VSK) 

 सदर मूल्यमापनाचे गुण विद्या समीक्षा केंद्र (VSK) यांचेमार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पोर्टलवर भरायचे असून याबाबतच्या सविस्तर सूचना यापूर्वी यु-ट्युबद्वारे देण्यात आलेल्या आहेत.

विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा चॅटबॉट संकलित मूल्यमापन चाचणी-१(PAT -२) गुण भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यावर संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT-२) शिक्षकांनी नोंदविणे आवश्यक आहे. 

सदर चॅटबॉटवर संकलित मूल्यमापन चाचणी -१ (PAT -२) चे गुण शिक्षकांनी कसे नोंदवावेत याच्या सविस्तर मार्गदर्शिका लिंक खालीलप्रमाणे देण्यात येत आहे.


संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT-२) चॅटबॉट मार्गदर्शिका लिंक 


गुण नोंदविण्याचा कालावधी

तसेच राज्यातील शिक्षकांना संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT -२) चे गुण PAT (महाराष्ट्र) या चॅटबॉटवर नोंदविणेकरिता जिल्ह्यांना दि. ११ नोव्हेंबर २०२४ ते २६ नोव्हेंबर २०२४ पर्यंतचा कालावधी देण्यात येत आहे. 

संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT-२) गुणांची नोंद करणेसाठी लिंक 


जिल्हा समन्वयक निवड 

उपरोक्त कामकाजासाठी जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथ/माध्य., शिक्षण निरीक्षक व प्रशासन अधिकारी, म.न.पा./न.पा. यांनी आपल्या कार्यालयातील एका अधिकाऱ्याकडे PAT (महाराष्ट्र) जिल्हा समन्वयक म्हणून जबाबदारी यापूर्वी निश्चित केलेली असेल.


 जिल्हा समन्वयक यांची जबाबदारी

त्यानुसार सदर जिल्हा समन्वयक यांनी जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा चॅटबॉटवर संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT-२) चे गुण कसे भरावेत याबाबत आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करावे. 

तसेच ज्या शाळांमध्ये संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT - २) घेण्यात आलेली आहे अशा इयत्ता तिसरी ते नववीच्या शाळामधील विषयनिहाय विद्यार्थ्यांचे गुण चाटबॉटवर नोंदविणेबाबत कार्यवाही करण्यात यावी.


 तांत्रिक अडचणी सोवण्यासाठी लिंक 

चाटबॉटच्या बाबतीत तांत्रिक अडचण येणाऱ्या शिक्षकांनी सोबत दिलेल्या गुगल लिंकवर प्रतिसाद नोंदवावा.

तांत्रिक अडचणी सोवण्यासाठी गुगल लिंक

 

हेही वाचा - दिवाळीच्या सुट्टीत विद्यार्थ्यांसाठी उपक्रम 

हेही वाचा - APAAR ID : महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी नवीन ओळख प्रणाली 

हेही वाचा - राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा 2024 ला मुदतवाढ : संपूर्ण माहिती जाणून घ्या !  

हेही वाचा - PARAKH 2024 : शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण (SEAS) २०२४ चे आयोजन 



PAT-२ चाचणीचे गुण chatbot वर  नोंदविण्याचे महत्त्व

PAT-२ चाचणीचे गुण नोंदविणे हे शिक्षण प्रक्रियेतील महत्त्वाचे पाऊल आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा मागोवा घेणे सोपे होणार आहे. तसेच, विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील विकासकडे अधिक लक्ष पुरविणे शक्य होईल.


सारांश 

PAT-२ चाचणी महाराष्ट्रातील शैक्षणिक व्यवस्थेत विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. शिक्षकांच्या सहभागाने शिक्षणाच्या गुणवत्तावाढीमध्ये मोठा वाटा पडणार आहे. PAT (महाराष्ट्र) चॅटबॉटद्वारे PAT-२ चाचणीचे गुण नोंदविणे ही प्रक्रिया सुलभ आणि आधुनिक पद्धतीने राबवली जात आहे, ज्यामुळे राज्यातील शिक्षण प्रणालीमध्ये सकारात्मक बदल संभवत आहे.

Post a Comment

0 Comments