वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण २०२५-२६ करिता ऑनलाईन नावनोंदणी करण्यास मुदतवाढ – सर्व शिक्षकांसाठी महत्त्वाची माहिती!
शिक्षक म्हणून पदोन्नती आणि वेतन श्रेणीमध्ये प्रगती साधायची असेल, तर प्रशिक्षण पूर्ण करणे आता अनिवार्य झाले आहे. महाराष्ट्र शासनाने वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणीसाठी प्रशिक्षण घेणे बंधनकारक केले आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या निर्देशानुसार २०२५-२६ वर्षासाठी हे प्रशिक्षण ऑफलाइन पद्धतीने घेतले जाणार असून, ऑनलाईन नावनोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
सदर प्रशिक्षण नोंदणीची सुरुवात दिनांक 15 एप्रिल 2025 पासून होणार होती परंतु काही तांत्रिक कारणास्तव नोंदणीची सुरुवात दिनांक 21 एप्रिल 2025 पासून सुरू करण्यात आली आहे. नोंदणीचा कालावधी दिनांक 05 मे 2025 पर्यंत सुरू राहील अशा प्रकारच्या सूचना एस सी ई आर टी पुणे यांच्यामार्फत नव्याने देण्यात आलेले आहेत.
या लेखात आम्ही या प्रशिक्षणाशी संबंधित सर्व महत्त्वाच्या गोष्टी सोप्या भाषेत स्पष्ट करणार आहोत. जर आपण पात्र शिक्षक असाल, तर ही संधी गमावू नका!
प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नावनोंदणी कशी करावी?
१. नोंदणी कुठे व कशी करायची?
परिषदेमार्फत विकसित www.maa.ac.in या संकेतस्थळावर जाऊन "प्रशिक्षणे" टॅबमधून "वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण" वर क्लिक करून नोंदणी प्रक्रिया सुरु करावी.
२. नोंदणीची नवीन तारीख व कालावधी:
दिनांक : 21 एप्रिल 2025 सकाळी 11.00 वाजेपासून
शेवटची तारीख: 02 मे 2025 संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत
नोंद: यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही.
नावनोंदणी प्रक्रिया २१ एप्रिल २०२५ सकाळी ११ वाजता सुरू होईल आणि ०२ मे २०२५ संध्याकाळी ६ वाजता संपेल.
पात्रता आणि अटी काय आहेत?
वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी: ३० एप्रिल २०२५ पर्यंत १२ वर्षे अर्हताकारी सेवा पूर्ण असावी.
निवड वेतन श्रेणीसाठी: ३० एप्रिल २०२५ पर्यंत २४ वर्षे अर्हताकारी सेवा पूर्ण असावी.
प्रशिक्षणाची रचना, पद्धत आणि गट
हे प्रशिक्षण ऑफलाईन पद्धतीने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) च्या माध्यमातून घेतले जाईल.
चार प्रमुख गट तयार करण्यात आले आहेत:
प्राथमिक गट – इ.१ली ते ८ वी
माध्यमिक गट – इ.९ वी, १० वी
उच्च माध्यमिक गट – इ.११ वी, १२ वी
अध्यापक विद्यालय गट
कला व शारीरिक शिक्षकांनी माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक गटात योग्य पर्याय निवडावा.
नावनोंदणीपूर्वी काय तयारी करावी?
नोंदणीपूर्वी आवश्यक तयारी
नोंदणीपूर्वी खालील गोष्टी तपासून घ्याव्यात:
www.maa.ac.in वर उपलब्ध SOP आणि प्रशिक्षण व्हिडिओ अवश्य पाहावेत.
Video link -
आपल्या माहितीची खातरजमा शालार्थ/सेवार्थ/BMC पोर्टलवरून करून घ्यावी. आपली माहिती शालार्थ/सेवार्थ/BMC पोर्टलवर अपडेट असल्याची खात्री करा. गरज असल्यास अद्ययावत करावी.
आवश्यक माहिती:
नाव (देवनागरी लिपी), लिंग, जन्म तारीख, पदनाम, UDISE क्रमांक, शाळेचे नाव व प्रकार, शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता, मोबाईल, ईमेल इ.
माहितीमध्ये पुढील गोष्टी तपासा:
नाव (देवनागरीत)
जन्म तारीख
पदनाम
नियुक्ती तारीख
शाळेचे नाव, UDISE नंबर
शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता (जर ती सेवा कालावधीत सुधारली असेल तर)
ई-मेल व मोबाईल क्रमांक
ओटीपी द्वारे नावनोंदणी verification पूर्ण करा
नावनोंदणी करताना दिलेल्या ई-मेल आणि मोबाईलवर OTP येईल.
दोन्ही OTP टाकूनच नावनोंदणी प्रक्रिया पूर्ण होते.
ही माहिती पुढील संवादासाठी आवश्यक आहे.
प्रशिक्षण शुल्क
प्रति प्रशिक्षणार्थी शुल्क: ₹२,०००/-
हे शुल्क ऑनलाइन पद्धतीने (Debit/Credit Card, Netbanking, UPI) भरता येईल.
एकदा भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत मिळणार नाही.
प्रशिक्षणाचे माध्यम आणि साहित्य
प्रशिक्षण मराठी भाषेत घेतले जाईल.
वाचन साहित्य मराठी, इंग्रजी, व उर्दू या माध्यमांमध्ये उपलब्ध असेल.
याबाबत पर्याय नावनोंदणीवेळी उपलब्ध आहे.
प्रशिक्षणाची पावती व पुढील उपयोग
नावनोंदणी यशस्वी झाल्यानंतर PDF पावती मिळेल.
पावतीवर नोंदणी क्रमांक, प्रशिक्षण गट इत्यादी माहिती असते.
ही पावती सुरक्षित ठेवावी, कारण ती प्रशिक्षणासाठी आवश्यक आहे.
तांत्रिक अडचण आल्यास संपर्क
ई-मेल: gradetraining@maa.ac.in
संपर्क क्रमांक:
अभय परिहार – ९००४११९९२६
अभिनव भोसले – ८२०८८७९१५९
Trifmd Pvt. Ltd. – ९५११८७४३७३ (कार्यालयीन वेळात)
सारांश
आपण जर पात्र शिक्षक असाल आणि पदोन्नतीचा विचार करत असाल, तर ही नावनोंदणी लवकरात लवकर पूर्ण करा. सर्व माहिती काळजीपूर्वक तपासूनच नोंदणी करा. ही एक सुवर्णसंधी आहे जी आपल्या शैक्षणिक प्रवासात पुढचे पाऊल ठरू शकते.
नोंदणीसाठी link - click here
पत्र सविस्तर वाचा -
विषयः वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण २०२५-२०२६ करिता ऑनलाईन नावनोंदणी करणेबाबत
संदर्भ:- 1. शासन निर्णय क्र. शिप्रधो २०१९/प्र.क्र.43/प्रशिक्षण, दि.२०,०७,२०२१
2. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे पत्र क्रमांक राप्रधो २०२५/प्र.क्र. २६ / प्रशिक्षण दि. ०९.०४.२०२५
उपरोक्त संदर्भ दिनांक २० जुलै २०२१ च्या शासननिर्णयानुसार वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणीसाठी पात्र होणेकरिता वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य आहे.
संदर्भामधील शासन निर्णयातील परिच्छेद क्र. 2 नुसार वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाचे नियोजन व सनियंत्रणाची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे सोपवण्यात आलेली आहे. यानुसार सदर प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नावनोंदणीकरिता परिषदेमार्फत पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे. या पोर्टलवर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय तसेच कला व शारीरिक शिक्षक (मान्यताप्राप्त) या चार गटातील पात्र शिक्षकांना नाव नोंदणी करणेसाठी पुढीलप्रमाणे दिलेल्या सूचनांनुसार कार्यवाही करावी. (नोंदणीबाबतचा सर्व तपशील संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.)
१) प्रशिक्षणाच्या नाव नोंदणीकरिता परिषदेच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावरील प्रशिक्षणे या टॅब मधील वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण या टॅब वर क्लिक करून प्रकिया सुरु करावी.
२) वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी दिनांक ३०.०४.२०२५ पर्यंत एकूण १२ वर्षे अर्हताकारी सेवा पूर्ण होणे अनिवार्य आहे.
३) निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी दिनांक ३०.०४.२०२५ पर्यंत एकूण २४ वर्षे अर्हताकारी सेवा पूर्ण होणे अनिवार्य आहे.
४) प्रशिक्षण नोंदणी साठीचा नवीन दिनांक २१.०४.२०२५ रोजी सकाळी ११.०० वाजेपासून दिनांक ०२.०५.२०२५ रोजी संध्याकाळी ०६.०० वाजेपर्यंत पर्यंत सुरु राहील. यासाठी कोणत्याही प्रकारची मुदतवाढ देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.
५) सदरचे प्रशिक्षण हे ऑफलाईन पद्धतीने असून सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांचेमार्फत एकाच कालावधीत घेण्यात येणार आहे.
६) प्रस्तुत प्रशिक्षणासाठी पुढीलप्रमाणे ०४ गट करण्यात आलेले आहेत
गट क्र. १- प्राथमिक गट (इ.१ली ते ४ थी, इ.१ली ते ५ वी, इ.१ली ते ७ वी, इ.१ली ते ८ वी, इ.६वी ते ८ वी)
गट क्र. २- माध्यमिक गट (इ.९ वी, १० वी)
गट क्र. ३-उच्च माध्यमिक गट (इ.११वी, १२ वी)
गट क्र. ४- अध्यापक विद्यालय गट
मान्यताप्राप्त कला व शारीरिक शिक्षकांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातील संबंधित पर्याय निवडून प्रशिक्षणासाठी नोंदणी करावी.
७) नोंदणी करण्यापूर्वी सोबत देण्यात आलेल्या SOP तसेच प्रशिक्षण व्हिडिओचे अवलोकन करूनच नोंदणी करावी
८) प्रशिक्षणार्थीनी नोंदणी करण्याआधी आपली माहिती शालार्थ सेवार्थ/ बीएमसी पोर्टलवर जाऊन अचूक असल्याची खात्री करावी, जर काही दुरुस्ती असेल तर संबंधितांनी आधी शालार्थ सेवार्थ/ बीएमसी पोर्टलवर वैयक्तिक माहिती अद्ययावत करूनच नंतर नाव नोंदणी करावी.
९) शालार्थ/सेवार्थ/ बीएमसी प्रणालीवर अद्ययावत करावयाची माहिती खालील प्रमाणे
• स्वतःचे नाव (देवनागरी लिपी)
• लिंग
• जन्म दिनांक
• पदनाम
Udise No.
• जिल्हा
तालुका
• शाळा व्यवस्थापन प्रकार
• नियुक्ती दिनांक
• शाळेचे नाव
मुख्याध्यापकाचे नाव
• मुख्याध्यापकाचा संपर्क क्रमांक
• व्यावसायिक अर्हता (सेवा कालावधीत व्यावसायिक अर्हता वाढवली असल्यास)
• शैक्षणिक अर्हता (सेवा कालावधीत शैक्षणिक अर्हता वाढवली असल्यास)
• मोबाईल क्रमांक
• ई-मेल आयडी
१०) प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करतेवेळी संबंधितांनी आपला अचूक शालार्थ/सेवार्थ/बीएमसी ID, ई-मेल आय.डी. व मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती सोबत ठेवावी.
११) आपण नोंदणी करत असताना आपल्या शालार्थ/सेवार्थ/बीएमसी या पोर्टलवर नोंदवलेल्या ई-मेल आय.डी. वर OTP येईल. प्राप्त OTP दिलेल्या प्रणालीवर नोंदवून नोंदणी पूर्ण करावी. तसेच आपल्या शालार्थ/सेवार्थ/बीएमसी या पोर्टलवर नोंदवलेल्या मोबाईल क्रमांकावर OTP येईल प्राप्त OTP नोंदवून नोंदणी पूर्ण करावी. ई-मेल आय.डी. व मोबाईल क्रमांक यांचे verification होणे आवश्यक आहे. नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावरच प्रशिक्षणाच्या अद्ययावत सूचना येणार आहेत याची नोंद घ्यावी.
१२) नोंदणी प्रक्रिया अंतिम करण्यापूर्वी आपल्या भरलेल्या संपूर्ण माहितीची काळजीपूर्वक पडताळणी करावी. आपण निवडलेला प्रशिक्षण गट (प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, अध्यापक विद्यालय) व प्रशिक्षण प्रकार (वरिष्ठ व निवड) यास पूर्णपणे आपण जबाबदार असणार आहात.
१३) प्रस्तुत प्रशिक्षणासाठी आवश्यक शासन निर्णय, सूचना व मार्गदर्शनपर संदर्भ साहित्य, व्हिडीओ, सर्व माहिती www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच प्रशिक्षणाशी निगडीत अद्ययावत सूचना वेळोवेळी या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहेत.
१४) या प्रशिक्षणासाठी संबंधित जिल्ह्याचे प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था हे जिल्ह्यासाठी प्रमुख अधिकारी असतील तर मुंबई शहर व उपनगर या जिल्ह्यांसाठी उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई हे जिल्ह्यासाठी प्रमुख अधिकारी असतील.
१५) इंटरनेट बँकिंग/ क्रेडीट/ डेबिट कार्ड/UPI payment या माध्यमातून प्रशिक्षण शुल्क भरता येईल.
१६) सदर प्रशिक्षण सशुल्क असल्याने प्रति प्रशिक्षणार्थी रु.२,०००/- (अक्षरी रुपये दोन हजार मात्र) शुल्क ऑनलाईन पद्धतीने (Credit Card, Debit Card, Internet Banking, UPI Payment) अदा करणे आवश्यक आहे.
१७) एकदा भरण्यात आलेले प्रशिक्षण शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही याबाबत परिषदेशी कोणताही पत्रव्यवहार करू नये. त्यामुळे सदर प्रशिक्षण शुल्क भरताना प्रशिक्षणार्थ्यांनी स्वतःची माहिती काळजीपूर्वक भरावी. प्रशिक्षण शुल्क व्यतिरिक्त सेवाशुल्क बँकेच्या guideline नुसार प्रशिक्षणार्थीना लागू राहतील याची नोंद घ्यावी.
१८) ज्या कालावधीतील प्रशिक्षणासाठी शुल्क जमा केले आहे त्याच कालावधीसाठीच ते मर्यादित असेल.
१९) प्रशिक्षण नावनोंदणी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर नावनोंदणीची ऑनलाईन (रिसिप्ट) पावतीची PDF जतन करून ठेवावी सदर पावतीवर आपण नमूद केल्याप्रमाणे प्रशिक्षण गट व नोंदणी क्रमांक इ. तपशील असणार आहे. सदरची सर्व माहिती प्रशिक्षण पूर्ण करणेसाठी आवश्यक असणार आहे. तसेच सदरची पावती आपल्या नोंदणी केलेल्या ई मेलवर देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
२०) नोंदणी अर्ज भरताना काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास स्वतःच्या रजिस्टर Email आय.डी. वरून gradetraining@maa.ac.in या ई-मेल आय.डी. वर संपर्क करावा.
२१) नोंदणी केलेल्या शिक्षकांचे गटनिहाय प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात येईल. ऑफलाईन प्रशिक्षण आयोजनाचा कालावधी प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व, शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांचे संयुक्त स्वाक्षरीने पत्राद्वारे स्वतंत्ररित्या कळविण्यात येईल. तसेच वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाच्या अधिक माहिती साठी वेळोवेळी www.maa.ac.in हे संकेत स्थळ पाहावे.
२२) प्रशिक्षण वर्ग मराठी माध्यमातून होईल. तथापि वाचनसाहित्य मराठी व्यतिरिक्त इंग्रजी व उर्दू माध्यमातून उपलब्ध असेल. याची नोंद घेण्यासाठीची सुविधा नाव नोंदणी प्रक्रियेच्या पोर्टलवर देण्यात आली आहे.
उपरोक्त सूचना आपल्या कार्यक्षेत्रातील चारही गटातील शिक्षक संवर्गातील संबंधितांना आपल्या स्तरावरून निदर्शनास आणून द्यावे व सदर प्रशिक्षणासाठी पात्र शिक्षकांना नाव नोंदणी करण्यास अवगत करण्यात यावे प्रशिक्षणाच्या अधिकच्या समन्वयासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
अभय परिहार अधिव्याख्याता संपर्क क्रमांक - ९००४११९९२६
अभिनव भोसले - विषय सहाय्यक संपर्क क्रमांक - ८२०८८७९१५९
तांत्रिक सहाय्य (Trifmd Pvt. Ltd.) संपर्क क्रमांक ९५११८७४३७३ (कार्यालयीन वेळेत)
0 Comments